शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीक विमा काढायचा काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 05:00 IST

खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना २३ जुलै २०२१ पर्यंत मुदत दिली हाेती. यापुढे सरकारच्या वतीने मुदत वाढल्यास पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते. त्या अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये प्रभावी जनजागृती हाेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्दे३७,५७० शेतकऱ्यांनी काढला खरिपाचा विमा; मुदत वाढण्याची शक्यता

दिलीप दहेलकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पंतप्रधान पीक विमा याेजनेंतर्गत गडचिराेली जिल्ह्यातील आतापर्यंत जवळपास ३७ हजार ५७० शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा काढला आहे. विमा काढूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अपेक्षित विम्याची रक्कम मिळत नसल्याने प्रतिसाद कमी मिळत असल्याचे दिसून येते. दरम्यान प्रिमियमच्या माध्यमातून विमा कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीक विमा काढायचा का? असा प्रश्न जिल्ह्यातील अनेक शेतकरी करताना दिसून येत आहेत.खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना २३ जुलै २०२१ पर्यंत मुदत दिली हाेती. यापुढे सरकारच्या वतीने मुदत वाढल्यास पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते. त्या अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये प्रभावी जनजागृती हाेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

३०% शेतकऱ्यांची पाठ

गतवर्षी जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचा विमा काढला. नुकसान हाेऊनही विमा कंपन्यांकडून पुरेशी भरपाई मिळाली नाही. यंदा ७०% शेतकऱ्यांनी विमा काढला. ३० टक्क्यांनी पाठ फिरवली

यावर्षी आतापर्यंत केवळ सिराेंचा तालुक्यात १०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.- भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

माझ्याकडे साडेतीन एकर धानाची शेती आहे. गतवर्षी आपण धान पिकाची लागवड करून खरीप पिकांचा विमा काढला. शेवटच्या टप्प्यात पाऊस आल्याने धान पिकाचे नुकसान झाले. कापणी केलेल्या धानाच्या सरड्या ओल्या झाल्या. नुकसानीच्या तुलनेत विम्याची भरपाई मिळाली नाही. शासनाने कंपनीला उचीत निर्देश देऊन बदल करणे आवश्यक आहे.- पंढरी किरंगे, शेतकरी

पंतप्रधान पीक विमा याेजनेंतर्गत खरीप पिकाला विमा देण्याची तरतूद आहे. मात्र कंपन्यांच्या जाचक अटीमुळे भरपाईची रक्कम फार कमी आहे. धान पीक लागवडीचा खर्च गेल्या दाेन वर्षात प्रचंड वाढला आहे. त्यातल्या त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे धान व इतर पिकांची नुकसान हाेत असते. नुकसानीच्या प्रमाणात विम्याचा लाभ मिळावा.- वासुदेव मडावी, शेतकरी

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा