शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टे खाद्यतेल घरी आणू नका; हृदयविकार, भेसळीचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 13:03 IST

सणासुदीत वाढतो प्रकार : पोटातील विकार बळावण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खाद्यतेलांमध्ये आता भेसळीचे प्रमाण वाढले असल्याने भेसळयुक्त तेल खाणेसुद्धा नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. बोगस तेलामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो. तसेच पोटातील विविध आजार बळावण्याचाही धोका बळावला आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने खाद्यतेलाची तपासणी केली जाते. या तपासणीत सुट्टया तेलाचे नमुने गोळा करून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात. खाद्यतेलात केमिकल तसेच रंग मिसळण्यात येते. ग्रामीण भागात या सुट्टया तेलाला प्रचंड मागणी असते. त्यामुळेच तेथे मोठ्या प्रमाणात बोगस तेलाची विक्री होते. सुट्ट‌या तेलात भेसळ असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी आरोग्य जपण्यासाठी या किरकोळ तेल विक्रीच्या दुकानातून खरेदी करू नये. तेल कंपन्यांनी नियम पाळावे. पॅकबंद तेलच विकण्याचे शासन आदेशाचे पालन करावे.

किराणा दुकानांत सर्रास विक्रीग्रामीण तसेच शहरी भागातील झोपडपट्टीच्या परिसरात सुट्टया तेलाची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. अनेकजण स्वस्त तेल म्हणून हे तेल खरेदी करतात. विशेष म्हणजे, त्या परिसरातील नागरिकांची ती गरज असते.

घाण्याच्या नावावर खाद्य तेलाची विक्रीआमचा स्वतःचा तेलाचा घाणा आहे, असे सांगून काही जण सुटे तेल विकत आहेत. ग्रामीण भागातील दुकानातून सुट्टे तेल मोठ्या प्रमाणावर विक्री होते. समोसा, भजी तळण्यासाठी सुट्ट्या तेलाचा वापर करीत असल्याचे दिसते.

भेसळ ते कसे ओळखावे?तेलाचे थेंब हातावर घेऊन ते घासावेत तेल गरम झाले की त्याचा वास घ्यावा. केमिकलयुक्त तेलात केमिकलचा वास येतो. तेल फ्रीजमध्ये ठेवल्यास पामतेल खाली घट्ट होते. गोडेतेल फ्रिजरमध्ये गोठवावे.

ग्राहक असतात अनभिज्ञ खाद्यतेल कोणीही एकदम वापरत नाही. त्याची चव ही कोणी चाखून पाहत नाही. मात्र त्या भेसळीच्या तेलाचे पदार्थ हमखास खारट होतात. त्याचे खापर स्वयंपाक करणाऱ्या गहिणीच्या माथी फटते.

अशी केली जाते भेसळखाद्यतेलात कधी पामतेल, स्वस्त तेल तसेच फ्लेवर तर कधी मीठ मिसळून भेसळयुक्त तेल ग्राहकांच्या माथी मारले जाते. सुट्टे तेल विक्रीला बंदी नव्हती तेव्हा सर्रास १५ किलो तेलात एखादा किलो मीठ टाकले जायचे.

किडनी, हृदयाला सर्वाधिक धोकाचांगल्या तेलातही काही प्रमाणात पाम तेल, मीठ, वापरलेले तेल मिसळून ते गरीब ग्राहकांच्या माथी मारले जाते. मात्र, भेसळयुक्त खाद्यतेलामुळे किडनी व हृदयाला अपाय होतो.

तपासणीसाठी घेतले सहा नमुने जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने गेल्या सहा महिन्यात तपासणीसाठी तेलाचे ६ नमुने घेण्यात आले. तसेच तपासणीसाठी १२ प्रकरणे लॅबमध्ये पाठविण्यात आलेले आहेत. सणासुदीच्या काळात तेलाची तपासणी मोठ्या प्रमाणात केली जाते.

"अन्न व औषध विभागातर्फे तेलाची तपासणी वर्षभरच केली जाते. नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले जातात. उघड्या डोळ्यांनी तेलाची शुद्धता तपासता येत नाही. त्यामुळे तपासणी करून नमुने परत येण्यासाठी अनेकदा उशीर होतो."- सुरेश तोरेम, अन्न सुरक्षा अधिकारी 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पGadchiroliगडचिरोली