शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

अधिकार क्षेत्राबाहेरील दाखले मागू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 05:00 IST

ग्रामपंचायतीला अस्तित्वात असलेल्या दस्तावेजांची सत्यप्रत म्हणून ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे सचिव या नात्याने दाखले पारित करतो. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश - २०१५ अनुसार ग्रामविकास विभाग यांचे शासन निर्णय क्रमांक आरटीएस-२०१८/प्र.क्र.१४५ /आस्था-५ दिनांक १३ फेब्रुवारी २०१९ अन्वये केवळ ७ लोकसेवा विहित कालमर्यादेत देण्याचे निश्चित केलेले आहे. इतर स्वयंघोषणा पत्राआधारे पूर्तता करावयाचे आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : शासनाच्या विविध योजना राबविताना महसूल विभागाकडून ग्रामपंचायत सचिवाला विविध प्रमाणपत्रांची मागणी केली जाते. मात्र काही दाखले ग्रामसेवकाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील आहेत. अशा दाखल्यांची मागणी ग्रामसेवकाकडे करू नये, अशी मागणी ग्रामसेवकांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. ग्रामपंचायतीला अस्तित्वात असलेल्या दस्तावेजांची सत्यप्रत म्हणून ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे सचिव या नात्याने दाखले पारित करतो. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश - २०१५ अनुसार ग्रामविकास विभाग यांचे शासन निर्णय क्रमांक आरटीएस-२०१८/प्र.क्र.१४५ /आस्था-५ दिनांक १३ फेब्रुवारी २०१९ अन्वये केवळ ७ लोकसेवा विहित कालमर्यादेत देण्याचे निश्चित केलेले आहे. इतर स्वयंघोषणा पत्राआधारे पूर्तता करावयाचे आहे. असे असतानाही शासनाच्या योजनेकरिता दिलेल्या अर्जात ग्रामपंचायत सचिवांचे रहिवासी, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अनाथ असल्याचे प्रमाणपत्र, कौटुंबिक विवरणपत्राची मागणी केली जाते. जी सचिवाकडे उपलब्ध नसते.सदर अधिकार क्षेत्रा बाहेरील दाखले न दिल्यास ग्रामस्थांशी वाद उफाळून येतो. ग्रामसेवकावर  दबावतंत्राचा वापर केला जात असल्याने त्यांची मानसिकता ढासळलेली आहे. त्यामुळे हे दाखले ग्रामपंचायत सरपंच/सदस्य/पोलीस पाटील या सक्षम व्यक्तींकडून स्वीकारण्यात यावेत, असे निवेदनात म्हटले आहे. या विविध मुद्द्यांवर तालुका संघटनेनी चामोर्शी तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.तहसीलदार यांनी विषय समजून घेऊन वरिष्ठांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. ग्रामविकास मंत्रालय, महसूल व समाजकल्याण विभागाचे शासन निर्णय विरोधाभास दर्शवित असल्याने या संघर्षास ग्रामसेवक संवर्ग बळी पळतोय, असे युनियनचे तालुका अध्यक्ष यादव मुळे यांनी प्रतिपादन केले. यावेळी तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेचे कोषाध्यक्ष धनंजय शेंडे, दिलीप शेंडे, ग्रामविकास अधिकारी मधुकर कुकडे, श्रीकृष्ण मंगर, मंगेशकुमार वाळके, विशाल चिडे आदी   पदाधिकारी उपस्थित होते.

गावात वाद वाढलेजे दाखले देण्याचे ग्रामसेवकांना अधिकार नाही, अशा दाखल्यांची नागरिक मागणी करतात. दाखला न दिल्यास ग्रामसेवक जाणून-बूजून दाखला देत नाही, असा गैरसमज नागरिकांमध्ये निर्माण हाेते. यातून नागरिक व ग्रामसेवक यांच्यामध्ये वाद-विवाद हाेतात. या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामसेवकांनी केली आहे. 

 

टॅग्स :Tahasildarतहसीलदारgram panchayatग्राम पंचायत