शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

कौशल्य विकासासाठी जिल्ह्याला 175 कोटींचा निधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2021 5:00 AM

केवळ पोलिसांच्या कारवाईने या जिल्ह्यातील नक्षलवाद संपणार नाही. त्यासाठी रोजगार आणि विकासात्मक कामांवर भर देण्याचा प्रयत्न आहे. गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेजसह चांगल्या शाळा, आरोग्याच्या सोयी-सुविधा निर्माण केल्या जात आहेत. सोबतच तालुकास्तरावर आरोग्य तपासणी व उपचार शिबिरे घेण्याच्या सूचना केल्या असल्याचे ते यावेळी म्हणाले.

लाेकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : गडचिरोली जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे करणे गरजेचे आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून या जिल्ह्याची मागासलेपणाची ओळख पुसायची आहे. तरुण वर्गाला रोजगार मिळण्यास सक्षम बनविण्यासाठी त्यांना कौशल्य विकासाची जोड मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसकडून (टीसीएस) जिल्ह्याला १७५ कोटींचा निधी मिळणार आहे, अशी माहिती पालकमंत्रीएकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि.४) येथे बोलताना दिली.  येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा समन्वयक किरण पांडव, जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, महिला आघाडी प्रमुख छाया कुंभारे, भरत जोशी, युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख उमा चंदेल यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, केवळ पोलिसांच्या कारवाईने या जिल्ह्यातील नक्षलवाद संपणार नाही. त्यासाठी रोजगार आणि विकासात्मक कामांवर भर देण्याचा प्रयत्न आहे. गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेजसह चांगल्या शाळा, आरोग्याच्या सोयी-सुविधा निर्माण केल्या जात आहेत. सोबतच तालुकास्तरावर आरोग्य तपासणी व उपचार शिबिरे घेण्याच्या सूचना केल्या असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी शिवसेनेच्या विविध आघाड्यांसोबत काँग्रेसच्या वतीनेही शिंदे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

निधी कमी पडू देणार नाही

नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सोबत घेऊन लढायचे किंवा कसे ते तुम्हीच आपल्या पातळीवर ठरवा, अशी सूचना करत त्यांनी कार्यकर्त्यांनी स्वतःला उमेदवार समजून पुढाकार घेऊन निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांसाठी काम करावे, असे आवाहन केले. कुरखेडा नगरपंचायतींमधील विविध कामांचे प्रस्ताव आपल्याकडे आले आहेत. त्यासाठी निधी कमी पडणार नाही, असे शिंदे यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेministerमंत्री