शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

जिल्ह्याला रुग्णवाहिका मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 23:44 IST

नक्षलग्रस्त व अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यसेवा रामभरोसे सुरू आहे. येथील अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने रुग्ण त्रस्त आहेत. पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिकाही उपलब्ध नाहीत.

ठळक मुद्देखासदारांचे बैठकीत आश्वासन : १७ रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलग्रस्त व अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यसेवा रामभरोसे सुरू आहे. येथील अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने रुग्ण त्रस्त आहेत. पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिकाही उपलब्ध नाहीत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात बैठक बोलविण्यात आली. या बैठकीत खा. अशोक नेते यांनी गडचिरोली जिल्ह्याला शासनाकडून नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे जिल्ह्याला लवकरच नव्या रुग्णवाहिका मिळणार आहेत.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्यविषयक समस्या मार्गी लावण्याच्या उद्देशाने बैठक बोलाविली. या बैठकीला प्रामुख्याने खा. अशोक नेते उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात एक जिल्हा सामान्य रुग्णालय, तीन उपजिल्हा, नऊ ग्रामीण रुग्णालय आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३७६ आरोग्य उपकेंद्र तसेच काही आरोग्य पथक व फिरत्या चिकित्सालयाची व्यवस्था आहे. जिल्ह्यातील बहुतांश भाग दुर्गम असल्याने रुग्णांना रुग्णालयात ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो.जिल्ह्यात गर्भवती महिलांना रुग्णालयात आणण्यासाठी तसेच घरी पोहोचविण्यासाठी १०२ क्रमांकाच्या केवळ आठ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. जिल्ह्यात १ हजार ६०० पेक्षा अधिक गावे आहेत. एवढ्या मोठ्या गावातील रुग्णांना सुविधा देण्यासाठी उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका कमी पडत आहेत. अपघात तसेच दुर्घटनेतील गंभीर रुग्णांना रुग्णालयात आणण्यासाठी वेळेवर शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. परिणामी अनेक जणांना जीव गमवावा लागतो. जिल्ह्यात सद्य:स्थितीत १०८ क्रमांकाच्या नऊ रुग्णवाहिका आहेत. बºयाचदा एकाचवेळी अनेक ठिकाणी अपघात झाल्यास तेथील जखमी रुग्णांना रुग्णालयात वेळेवर पोहोचविणे शक्य होत नाही. या सर्व समस्यांची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते यांनी सविस्तरपणे खा. अशोक नेते यांना दिली.यावर खा. नेते यांनी जिल्ह्यातील आरोग्याची समस्या केंद्र व राज्य शासनाकडे आग्रहीपणे मांडून २०१८ वर्षात गडचिरोली जिल्ह्याला नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न करू, असे सांगितले. बैठकीला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांच्यासह प्रमुख वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.