शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘जनता कर्फ्यू’साठी जिल्हावासीय झाले सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

रविवारी जनता कर्फ्यू आणि सोमवारपासून गुरूवारपर्यंत बाजारपेठ बंद राहणार असल्यामुळे गडचिरोलीसह अनेक ठिकाणी नागरिकांनी आवश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी झुंबड केली होती. त्यात भाजीपाला, किराणा दुकानात सर्वाधिक गर्दी होती. रविवारी घराबाहेर न निघण्याची नागरिकांची मानसिकता आहे.

ठळक मुद्देसाहित्य खरेदीसाठी झुंबड । सोमवारपासून राहणार जिल्हाभरातील मार्केट बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण अजून आढळलेला नाही. तरीही प्रशासनाकडून घेतल्या जात असलेल्या आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपायांना नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून सहकार्य केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी (दि.२२) कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्याकरिता ‘जनता कर्फ्यू’ पाळला जाणार असून त्यासाठी जिल्हावासीय सज्ज झाले आहेत.दरम्यान जिल्ह्यात कोरोनाबाधित देशातून आलेल्या कुुटुंबातील २१ व्यक्तींना गृह निगराणीत (होम क्वॉरंटाईन) करून ठेवले होते. त्यातील ९ लोकांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संशयमुक्त करत मोकळे फिरण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे १२ जण शिल्लक होते. त्यात शनिवारी आणखी एका व्यक्तीची भर पडून ही संख्या १३ झाली. दरम्यान आतापर्यंत तपासलेल्या ४ नमुन्यांपैकी एकही कोरोना पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आहे.दरम्यान रविवारी जनता कर्फ्यू आणि सोमवारपासून गुरूवारपर्यंत बाजारपेठ बंद राहणार असल्यामुळे गडचिरोलीसह अनेक ठिकाणी नागरिकांनी आवश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी झुंबड केली होती. त्यात भाजीपाला, किराणा दुकानात सर्वाधिक गर्दी होती. रविवारी घराबाहेर न निघण्याची नागरिकांची मानसिकता आहे.मोफत वाटले मास्क आणि साबणदेसाईगंज येथील नगरसेवक आणि व्यावसायिक गणेश फाफट यांनी सामाजिक जाणिवेतून देसाईगंज शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मास्क आणि डेटॉल साबणांचे वाटप केले. रविवारी बंद राहणार असल्यामुळे सोमवारी पुन्हा गरजवंत लोकांना मास्क आणि हात धुण्यासाठी डेटॉल साबण वाटप केले जाईल असे त्त्यांनी सांगितले. त्यांनी २७ वेळा रक्तदान केले आहे.ग्रामसेवकांना द्यावी लागत आहे मृतकांची माहितीग्रामीण भागातील खेडेगावांमध्ये मार्च महिन्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नाव, गावाचे नाव, मृत्यूचे कारण आदीसह इतर माहिती ग्रामसेवकांना पंचायत समिती प्रशासनाला कळवावी लागत आहे. याशिवाय संबंधित ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये बाहेरगावावरून व जिल्ह्याच्या बाहेरून कोण व्यक्ती नातेवाईक म्हणून आली, याची नोंद ग्रामसेवक ठेवत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच ग्रामसेवक अलर्ट झाले आहेत. यासंदर्भाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संवर्ग विकास अधिकारी व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना दिल्या आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस