शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

जिल्हा रुग्णालय फुल्ल

By admin | Updated: October 2, 2015 06:05 IST

वातावरणातील बदलामुळे मागील १५ दिवसांपासून जिल्हाभरात तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे जिल्हा

गडचिरोली : वातावरणातील बदलामुळे मागील १५ दिवसांपासून जिल्हाभरात तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या अचानक दीडपटीने वाढली आहे. २५० खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयात ५०० रुग्ण उपचार घेत आहेत. तर बाह्यरुग्ण विभागात दरदिवशी जवळपास ७०० रुग्णांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागात नोंदणी करण्यापासून ते तपासणी, औषध घेण्यासाठी रुग्णांची भलीमोठी रांग लागली असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली येथे असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाभरातील रुग्ण दाखल होतात. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, मूल, सावली, गोंडपिपरी या तालुक्यांमधीलही रुग्ण गडचिरोली येथेच उपचारासाठी येतात. त्यामुळे या रुग्णालयात नेहमीच गर्दी राहते. मात्र वातावरणातील बदलामुळे मागील १५ दिवसांपासून रुग्णालयात रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. रुग्णांचे जत्थे उपचारासाठी दाखल होत आहेत. दमट वातावरणामुळे डासांची पैदास वाढून प्रामुख्याने मलेरिया, डेंग्यू या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. तर पावसाळ्यातील दूषित पाण्यामुळे अतिसार, टायफाईड, पिलिया आदी रोगांचे सुद्धा रुग्ण वाढले आहेत. बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत असले तरी वाढलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे २ ते ३ वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभाग सुरू राहत आहे. चिठ्ठी काढण्यापासून ते तपासणी करण्यापर्यंत रुग्णांची रांग लागत असल्याने रुग्णांना तासणतास रांगेत उभे राहावे लागत आहे. वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानाचे पीक घेतले जाते. धानाच्या बांधीत पाणी साचून राहत असल्याने डासांची पैदास या कालावधीत वाढत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालय, मोठ्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र व आरमोरी, कुरखेडा, अहेरी येथे उपजिल्हा रुग्णालय असले तरी या रुग्णालयांमध्ये पाहिजे त्या सुविधा उपलब्ध नाहीत. बहुतांश रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नाहीत, त्यामुळे रुग्णाची थोडीही गंभीर स्थिती लक्षात आल्यास तेथील डॉक्टरांकडून रेफर टू गडचिरोलीचा सल्ला रुग्णाला दिला जातो. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. जिल्हा रूग्णालयावरील भार कमी होण्यासाठी ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालयात सोयीसुविधा असणे आवश्यक आहे. (नगर प्रतिनिधी)२५० क्षमतेच्या रुग्णालयात ५०० रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयाची क्षमता जवळपास २५० खाटांची आहे. तरीही या रुग्णालयात सध्य:स्थितीत ५०० पेक्षा अधिक रुग्ण भरती होऊन उपचार घेत आहेत. २८ सप्टेंबर रोजी रुग्णालयात ५१४, २९ सप्टेंबर रोजी ५२३ व ३० सप्टेंबर रोजी ५०८ रुग्ण उपचार घेत होते. अनेक रुग्णांना खाली गादी टाकून उपचार घ्यावे लागत आहेत. २५ ते ३० सप्टेंबरदरम्यान बाह्यरुग्ण विभागात ३ हजार ५४४ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. उघड्यावरचे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे व दूषित पाण्यामुळे अतिसार, टायफाईड, पिलिया आदी रोग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे उघड्यावरचे अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे, घर व परिसरात स्वच्छता बाळगावी, घराजवळ नाली किंवा सांडपाणी असल्यास त्यामध्ये डास मरणाऱ्या औषधांची फवारणी करावी, घरातील पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस साचून ठेवू नये, हात धुतल्यानंतरच अन्नपदार्थ सेवन करावे.- डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोलीरुग्णालयात दाखल रुग्णमहिनाओपीडीआयपीडीएप्रिल१०,७६४२,१४७मे११,३७५२,२९८जून१२,१९८२,२२०जुलै१३,७९६२,४६६आॅगस्ट१३,९६०२,५९७सप्टेंबर१५,०८३४,२९०स्त्री रुग्णालय सुरू झाले असते तर जिल्हा सामान्य रुग्णालयावरील भार कमी होण्यास फार मोठी मदत झाली असती. सदर रुग्णालय डिसेंबरमध्ये सुरू होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.