शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला मिळाले फिरते कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 05:00 IST

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या फिरत्या संदर्भ सेवा केंद्राचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत गरीब आदिवासी जनतेला चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी हा एक मानाचा तुरा असल्याचे गौरवोद्गारही व्यक्त केले. तर फिरते कुष्ठरोग सेवा केंद्रामुळे कुष्ठरोग्यांच्या दारी जाऊन उपचार करणे शक्य होणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे म्हणाले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन : दुर्गम भागातील रुग्णांसाठी फायदेशिर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील कुष्ठरुग्णांना तातडीने संदर्भ सेवा मिळण्यासाठी जिल्ह्याला फिरते कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्र मिळाले. एका सुसज्ज वाहनाच्या माध्यमातून चालविले जाणारे हे केंद्र कुष्ठरोगाच्या रुग्णांंना संदर्भ सेवा देण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या फिरत्या संदर्भ सेवा केंद्राचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत गरीब आदिवासी जनतेला चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी हा एक मानाचा तुरा असल्याचे गौरवोद्गारही व्यक्त केले. तर फिरते कुष्ठरोग सेवा केंद्रामुळे कुष्ठरोग्यांच्या दारी जाऊन उपचार करणे शक्य होणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे म्हणाले.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कुष्ठरुग्णांना देवू केलेले व्हॅक्स बाथ, ड्रेसिंग किट, मसल स्टिम्युलेटर, एमसीआर चप्पल व स्प्लिन्ट, गॉगल अशा विविध उपकरणांची पडताळणी करून भविष्यात कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठीच्या योजनांवर चर्चा केली.प्रास्ताविक कुष्ठरोग संदर्श सेवेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळवे यांनी तर आभार डॉ.रूपेश पेंदाम यांनी मानले. यावेळी डॉ.तारा वलके, डॉ.पंकज हेमके, राजेंद्र ठोके, शिवचरण ठाकरे, पुरूषोत्तम तुपट यांच्यासह इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.४२२ जणांवर उपचारजिल्ह्यात आजघडीला ४२२ कुष्ठरुग्णांवर उपचार सुरू असून जुने ४०९ विकृतीचे रुग्ण आहेत. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता दुर्गम भागातील रुग्णांना उपचारासाठी कुष्ठरोग केंद्रावर पोहोचणे शक्य नाही त्या रुग्णांना कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्राच्या माध्यमातून ठराविक दिवशी गावात पोहोचून सेवा दिली जाणार आहे. 

टॅग्स :Healthआरोग्य