शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

महसूल कर्मचाऱ्यांचे जिल्हाभर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:19 IST

विविध मागण्यांसाठी राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देटप्प्याटप्प्याने करणार आंदोलन : १० ला सामूहिक रजेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विविध मागण्यांसाठी राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.नागपूर विभागात अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गाची पदे परस्पर अदलाबदलीने करण्यात यावी, पुरवठा विभागातील अव्वल कारकून पदावर महसूलच्या कनिष्ठ लिपीकांना दतर्थ पदोन्नती द्यावी, महसूल कर्मचाºयांचे विनंती बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावी, नागपूर विभागातील नायब तहसीलदारांची रिक्त पदे पदोन्नतीने भरावी, सरळ सेवा कोठ्यातील नायब तहसीलदाराची पदे दतर्थरित्या पदोन्नतीने भरावी, पदोन्नत नायब तहसीलदारांना नियमित पदांचा कार्यभार द्यावा, सेवानिवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत ते कार्यरत असलेल्या सर्व ठिकाणाहून मागविण्यात येणाºया नाहरकत प्रमाणपत्राची अट रद्द करावी, आदी मागण्यांसाठी ८ जुलै रोजी काळ्या फिती लावून आंदोलन केले. त्यानंतर दुपारच्या सुटीत निदर्शने केली.मागण्या मान्य न झाल्यास १० जुलै रोजी महसूल कर्मचारी सामुहिक रजेचा अर्ज सादर करून न्यायालयापुढे निदर्शने करतील. ११ व १२ जुलै रोजी लेखनी बंद ठेवून निदर्शने करतील. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलैपासून कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यात महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान यांच्या नेतृत्वात आंदोलन केले जात आहे. तालुकास्तरावर सरचिटणीस विजय करपते, संघटक अल्पेश बारापात्रे, गौरीशंकर ढेंगे, कोषाध्यक्ष विशाल खरतडे, कार्याध्यक्ष वनिशाम येरमे, महिला प्रतिनिधी अर्चना वडेट्टीवार, सोनाली कंकलवार यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले.विभागीय आयुक्तांनी चर्चेला बोलाविलेकर्मचाऱ्यांच्या निदर्शन आंदोलनाची दखल घेत विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी संघटनेच्या पदाधिकाºयांना चर्चेसाठी बोलाविले आहे. या चर्चेदरम्यान महसूल कर्मचाºयांच्या संपूर्ण मागण्या मान्य व्हाव्या, अशी अपेक्षा आहे. काही मागण्या प्रलंबित राहिल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान यांनी दिला आहे.