दत्तक गाव : परसबागेत भाजीपाल्याची होणार लागवड लोकमत न्यूज नेटवर्क एटापल्ली : कसनसूर परिसरातील चोखेवाडा हे गाव वन विभागाने दत्तक घेतले असून या गावातील नागरिकांना वन विभागाच्या मार्फतीने बियाणांचे वितरण करण्यात आले. आदिवासी बहूल भागातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने वन विभागाने चोखेवाडा हे गाव दत्तक घेतले. या गावातील नागरिकांना बियाणांचे वितरण करण्यात आले. बियाणांमध्ये दोडका, कारले, चवळी, भेंडी, टमाटर, भोपळा, दुधी यांचा समावेश आहे. ५१ कुटुंबांना बियाणांचे वितरण करण्यात आले. सदर बियाणे शेतकरी परसबागेत लावू शकणार आहेत. यावेळी कसनसूरचे क्षेत्र सहायक पी. बी. मानापुरे, ग्रामसेवक बारापात्रे, कसनसूरचे वनरक्षक एन. आर. सयाम, पोलीस पाटील शिवाजी नरोटे आदी उपस्थित होते. आदिवासी बहूल भागात मोठ्या प्रमाणात सांदवाडी आहे. मात्र या सांदवाडीचा उपयोग शेतकरी करीत नाही. त्यांना बियाणे उपलब्ध करून देऊन लागवडीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. यामुळे भाजीपाला उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.
चोखेवाडात बियाणांचे वितरण
By admin | Updated: July 8, 2017 01:15 IST