शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीचा बोनस शेतकऱ्यांना वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 00:49 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या केंद्रावरून धानाची विक्री केलेल्या शेतकºयांना आतापर्यंत १ कोटी ५ लाख ५८ हजार ९८८ रूपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअहेरी भागात अंमल : खरीपातील शेतकऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या केंद्रावरून धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत १ कोटी ५ लाख ५८ हजार ९८८ रूपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे. मात्र अहेरी कार्यालयांतर्गत अद्यापही बोनसपात्र शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी सुरू आहे.आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत खरेदी योजनेंतर्गत २०१७-१८ च्या खरीप हंगामात धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ५० क्विंटलच्या मर्यादेत प्रती क्विंटल २०० रूपयेनुसार बोनस देण्याची तरतूद आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाने २०१६-१७ च्या खरीप हंगामातील सर्व शेतकऱ्यांना बोनस वितरित केला. सन २०१७-१८ या खरीप हंगामातील बोनस वितरणाची कार्यवाही युध्दपातळीवर सुरू आहे. कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट परिसरातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात धानाची विक्री केली, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसची १ कोटी ५ लाख ५८ हजार ९८८ रूपयाची रक्कम वळती करण्यात आली आहे. यामध्ये कुरखेडा तालुक्यातील घाटी संस्थेंतर्गत खरकाडा केंद्रांवरील १५५ शेतकऱ्यांना ८ लाख ४५ हजार ७३६ रूपये इतका बोनस प्रती क्विंटल २०० रूपये प्रमाणे अदा करण्यात आला आहे. आंधळी केंद्रावरील ३३६ शेतकऱ्यांना १४ लाख ६० हजार ७६८ रूपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे. येंगलखेडा केंद्रांवरील ३१९ शेतकºयांना १८ लाख २२ हजार ८४ रूपयांचा बोनस वितरित केला आहे. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत देलनवाडी केंद्रांवरील ५२३ शेतकºयांना २५ लाख ४२ हजार ४६० रूपये, पोटेगाव केंद्रांवरील १०६ शेतकऱ्यांना ४ लाख ३३ हजार ७०० रूपये, चांदाळा केंद्रावरील ७० शेतकऱ्यांना ४८ लाख १ हजार ७४८ रूपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे. तसेच मौशीखांब केंद्रावरील २१५ शेतकऱ्यांना १४ लाख ९५ हजार ४२८ रूपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे. धानोरा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत सोडे केंद्रावरील १५४ शेतकºयांना ५ लाख ९९ हजार ४४४, घोट परिसराच्या आमगाव केंद्रावरील १०० शेतकऱ्यांना ५ लाख १६ हजार १६० व अड्याळ केंद्रावरील ६१ शेतकऱ्यांना ३ लाख ६१ हजार ४६० रूपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे. उर्वरित केंद्रांवरील याद्यांची पडताळणी युध्दपातळीवर सुरू आहे.रबी हंगामातील धान खरेदी वाढलीगतवर्षी सन २०१६-१७ च्या रबी हंगामात गडचिरोली व अहेरी कार्यालयांतर्गत मिळून सर्व केंद्रावर जवळपास ६२ हजार क्विंटलची धान खरेदी झाली होती. मात्र २०१७-१८ या रबी हंगामात जिल्ह्यात ७७ हजार १५६ क्विंटल इतकी धान खरेदी दोन्ही कार्यालयाच्या सहकारी संस्थांच्या केंद्रावर झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या रबी हंगामात १५ हजार क्विंटलने धान खरेदी वाढली आहे. याचे कारण आरमोरी, कुरखेडा व इतर भागात शेतकºयांनी सिंचन विहीर, शेततळे व इतर स्त्रोताच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे शेतकºयांनी रबी हंगामातील धान पीक घेतले. २ हजार ६२ शेतकºयांनी रबी हंगामात आविकाच्या केंद्रांवर धानाची विक्री केली.

टॅग्स :Farmerशेतकरी