शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

सीआरपीएफतर्फे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

By admin | Updated: May 11, 2014 00:20 IST

स्थानिक सीआरपीएफच्या ११३ बटालियनतर्फे सिव्हीक अ‍ॅक्शन कार्यक्रमाअंतर्गत मुरूमगाव परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नुकतेच करण्यात आले

मुरुमगाव : स्थानिक सीआरपीएफच्या ११३ बटालियनतर्फे सिव्हीक अ‍ॅक्शन कार्यक्रमाअंतर्गत मुरूमगाव परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नुकतेच करण्यात आले. सीआरपीएफच्यावतीने २३ एप्रिल ते ७ मे दरम्यान पोलीस मदत केंद्र मुरूमगाव येथे नागरिकांना साहित्याचे वितरण करण्यात आले. सीआरपीएफच्या ११३ बटालियनचे कमांडंट एस. एस. एच. रिझवी यांच्या मार्गदर्शनाखाली असिस्टंट कमांडंट स्वतंत्रकुमार यांनी परिसरातील सिंदेसूर, गोपीटोला, पोयाटोला, गुटालहूर, टोवीटोला, मुरूमगाव, मरारटोला, वड्डेटोला, आमपायली, गुर्रेकसा, रेडवाही, पन्नेमारा, बेलगाव, खेडेगाव, रेंगेगाव, रामपूर, मसाद, केहेकावाही आदी गावातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यात शिलाई मशिन, पाण्याचे ड्रम, जर्मनी गंज, ब्लाँकेट, साडी, मच्छरदाणी, रेडिओ, सौरदिवे आदी वस्तूंचा समावेश होता तर शालेय विद्यार्थ्यांसाठी व युवकांसाठी खेळाचे साहित्य, बॅडमिंटन, रॉकेट नेट, व्हॉलीबॉल स्पोर्ट कीट, क्रिकेट कीट, स्किपींग रोप आदी क्रीडा साहित्यांचा समावेश होता. या बरोबरच विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कंपास पेटी, टिफिन बॉक्स, नोटबुक, ड्रार्इंग बुक, स्केच पेन, स्केलपट्टी आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. शिक्षणाच्या सक्तीने ग्रामीण भागातील सामाजिक व आर्थिक विकास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्या अधिकाराप्रती जागरूक होऊन शिक्षण घेण्यास पाल्यांना प्रवृत्त करावे, असे प्रतिपादन असिस्टंट कमांडंट स्वतंत्रकुमार यांनी केले. यावेळी पीएसआय सुबहसिंग, आर. झगडे, मेघवाल, जगदीशन, क्रिष्णारेड्डी, मांडवे, स्वप्नील लोखंडे, निरांजन रणवरे, सचिन गढवे,स्वप्नील नाईक उपस्थित होते. (वार्ताहर)