कृषी मेळाव्याचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्याला तहसीलदार अनमोल कांबळे, न.पं मुख्याधिकारी डॉ. सुरज जधव, पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. जिशांत नंदेश्वर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी शांताराम शनवार, कृषी अधिकारी पंचायत समिती मनीषा राजनहिरकी, विस्तार अधिकारी पंचायत समिती विभाग विनायक देव्हारे, वनरक्षक नरेंद्र भरे, कृषी साहाय्यिका नलिनी सडमेक, कृषी साहाय्यक सुरेश आत्राम, पशू पर्यवेक्षक ज्योती गेडाम आदी उपस्थित होते.
मेळाव्याला उपस्थित ६० शेतकरी बांधवांना मोफत धान बी-बियाणे, तूर बियाणे व चिक्कू झाडांचे वाटप, १० नागरिकांना जात प्रमाणपत्र, २९ नागरिकांना उत्पन्न दाखले, ५७ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड, वनविभाग कार्यालय भामरागड यांच्याकडून ५० नागरिकांना पाणी फिल्टर बकेटचे वाटप, बाल विकास विभाग पंचायत समितीकडून तीन स्तनदा मातांना बेबी केअर किट पेटी, ४५ लहान मुलांना दूध पावडरचे वाटप करण्यात आले. विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले हाेेते. पशुसंवर्धन, जंतनाशक औषध व कीटकनाशकांचे वाटप करण्यात येऊन शासकीय योजनांबाबत गोंडी भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. सदर मेळाव्याकरिता भामरागड हद्दीतील जवळपास २५० नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. भामरागड तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना आपल्या सोयीनुसार प्रवास करता यावा याकरिता राहुल चव्हाण संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती भामरागड यांच्याशी समन्वय साधून २७ दिव्यांगांना मोफत तीनचाकी सायकलचे वाटप करण्यात आले.
पोलीस स्टेशनमध्ये पोलीस दादालाेरा खिडकी स्थापन करण्यात आलेली आहे. नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता पोलीस स्टेशन भामरागड येथे आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी उपस्थित नागरिकांना केलेले आहे. कृषी मेळावा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे, ज्ञानेश्वर भोसले, संघमित्रा बांबोळे यांच्यासह पाेलीस शिपायांनी सहकार्य केले.
130721\26314021img-20210713-wa0027.jpg
दिव्यांगंना सयकल वाटप करून एकत्र फोटो काढुन आनंद व्यक्त करताना