शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अहेरीच्या नगराध्यक्षांसह सात नगरसेवकांच्या अपात्रतेला स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:23 IST

आदेश : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर होणार सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : येथील नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सहा नगरसेवक अशा एकूण आठ जणांना २३ डिसेंबरला तत्कालीन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी अपात्र ठरवले होते. सत्ताधारी गटाचे व काँग्रेसचे नेते अजय कंकडालवार यांनी केलेल्या अवैध बांधकामाला समर्थन दिल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांवर होता. दरम्यान, नगराध्यक्षा रोजा करपेत यांनी याबाबत नगरविकास विभागाकडे अपिल दाखल केले होते. त्यानुसार नगरविकास विभागाने अपिल दाखल करून घेत तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ७ जानेवारी रोजी स्थगिती दिली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सुनावणी घेऊन पुढील निर्णय घेतील.

नगराध्यक्षा रोजा करपेत, उपनगराध्यक्ष शैलेंद्र पटवर्धन, नगरसेविका सुरेखा गोडसेलवार, नौरास रियाज शेख, मीना ऑडरे, नगरसेवक विलास गलबले, विलास सिडाम, महेश बाकेवार यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली होती. काँग्रेसच्या अजय कंकडालवार यांच्या गटासह राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नगरसेवकांचा यात समावेश आहे.

भाजपच्या वॉर्ड क्र. १५ मधील नगरसेविका शालिनी संजय पोहनेकर यांनी महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायत औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ४४ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांकडे डिसेंबर २०२२ मध्ये आक्षेप दाखल केला होता. अहेरी नगरपंचायत सभागृहात ऑक्टोबर २०२२ मध्ये सर्वसाधारण सभा पार पडली, यात वॉर्ड क्र. १० मध्ये अजय कंकडालवार यांनी नगर भूमापन क्र. ७८० व ७६६ मध्ये सार्वजनिक जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीररीत्या बांधकाम केल्याचा आरोप केला होता. या बांधकामाला या सभेत समर्थन देण्यात आले, तसा ठरावही पारित केला जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला. यातदेखील कंकडालवार यांनी विनापरवाना, तसेच अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा ठपका ठेवला होता. याचा हवाला देत तत्कालीन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी २३ डिसेंबरला अपात्रतेचे आदेश दिले होते.

दरम्यान, या कारवाईला नगराध्यक्षा रोजा करपेत यांनी नगरविकास विभागाकडे अपिलाद्वारे आव्हान दिले. त्यांचे अपिल दाखल करून घेत नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सुनावणी घेऊन निर्णय घेतील, तोपर्यंत पदाधिकाऱ्यांच्या अपात्रता आदेशास स्थगिती दिली आहे. त्यामुळे नगर पंचायतीतील सत्ताधारी गटाला दिलासा मिळाला आहे. 

तत्कालीन जिल्हाधिकारी कोणाच्या दबावात ? 

  • तत्कालीन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी २३ डिसेंबर रोजी अजय कंकडालवार यांच्या अनधिकृत बांधकामाला संरक्षण दिल्याचा ठपका ठेऊन अहेरी नगरपंचायतीतील पदाधिकाऱ्यांना अपात्र ठरवले. 
  • दुसऱ्याच दिवशी देंने यांची बदली झाली व त्यांच्या जागी अविश्यांत पंडा हे जिल्हाधिकारी म्हणून आले. जाता जाता तत्कालीन जिल्हाधिकऱ्यांनी कोणाच्या दबावात येऊन अपात्रतेचे आदेश काढले होते, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. 
टॅग्स :aheri-acअहेरीGadchiroliगडचिरोली