शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

अहेरीसाठी व्हीप जारी करण्याची भाजपवर नामुष्की

By admin | Updated: November 26, 2015 01:09 IST

भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेल्या अहेरी नगर पंचायतीत नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांनी भाजपकडून नामांकनपत्र

पालकमंत्र्याच्या नेतृत्वावर टीका : दोन उमेदवार रिंगणात राहिल्याने पेचअहेरी : भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेल्या अहेरी नगर पंचायतीत नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांनी भाजपकडून नामांकनपत्र दाखल करून ते कायम ठेवल्याने भारतीय जनता पक्षावर मतदानाच्या तोंडावर व्हीप जारी करण्याची पाळी आली आहे. अहेरी नगर पंचायतीत भारतीय जनता पक्षाला १७ पैकी ९ जागा मिळाल्या. भाजपच्या वतीने हर्षा रवींद्र ठाकरे व प्राजक्ता सचिन पेदापल्लीवार यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी नामांकनपत्र पेदापल्लीवार यांनी मागे घेतले नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या नेतृत्व क्षमतेवर भाजपमधील जुन्या नेत्यांनी बुधवारी प्रचंड टीकेचा भडीमार केला. नामांकनपत्र मागे घेतले नसल्याची बाब लक्षात घेऊन भाजपने लगेच बॅक डेटमध्ये पक्षाचा व्हीप जारी करून हर्षा ठाकरे यांना नगराध्यक्षपदी तर अन्नपूर्णा दामोधर सिडाम यांना उपाध्यक्षपदासाठी मतदान करण्याबाबत सदस्यांना मतदान करण्याबाबत सूचविले आहे. या घटनेमुळे भाजपमधील गटबाजी जाहीररीत्या समोर आली. पक्षाला बहुमत असताना दोघांचे अर्ज नगराध्यक्ष पदासाठी का भरण्यात आले, यावरही भाजपच्या जिल्हास्तरावरील नेत्यांमध्ये जोरदार चर्चेचा खल झाला. अर्ज कायम ठेवणाऱ्या प्राजक्ता पेदापल्लीवार यांचे यजमान यापूर्वी अहेरी ग्राम पंचायतीचे उपसरपंच होते व ते नाविसंचे जुने कार्यकर्ते असल्याने भाजपच्या जुन्या निष्ठावानांनी त्यांना डावलल्याची भावना अहेरीत आहे.