शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध धडे; ७४ रासेयाे अधिकाऱ्यांही समावेश

By दिलीप दहेलकर | Updated: December 25, 2023 19:54 IST

गडचिराेलीत पहिल्यांदाच शिबीर

दिलीप दहेलकर, गडचिराेली: स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या रासेयो विभागाच्या वतीने २५ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२४ या कालावधीत आयाेजित राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर आव्हान-२०२३ चे साेमवारला थाटात उद्घाटन झाले. या शिबीराला २२ विद्यापीठांमधील ५८० विद्यार्थी आणि ४२० विद्यार्थीनी स्वयंसेवक असे एकुण १००० विद्यार्थी तसेच ३७ पुरूष कार्यक्रम अधिकारी आणि ३७ स्त्री कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले आहेत. या सर्वांना दहा दिवस आपत्ती निवारणाचे धडे देण्यात येणार आहे.

१० दिवस होणाऱ्या शिबिराच्या यशस्वीतेसाठी ३० समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण वर्गाचे आयोजन सुमानंद सभागृह, गडचिरोली शासकिय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली व गाणली सभागृह, गडचिरोली, सुप्रभात मंगल कार्यालय, गडचिरोली येथे आयोजन करण्यात आलेले आहे. या १० दिवस होणऱ्या प्रशिक्षणासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे ५० तज्ञ व्यक्ती आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्रशुध्द प्रशिक्षण देणार आहेत. 

शिबिराच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी मंचावर खा. अशोक नेते, आ. कृष्णा गजबे, पोलीस अधीक्षक निलोत्पल, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, जळगाव विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील, राष्ट्रीय आपदा मोचनबलचे सहायक समादेशक प्रवीण धट, एन. डी.आर. एफचे सिनिअर इन्स्पेक्टर कृपाल मुळे, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.अनिल चिताडे, अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली, गोंडवाना विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे, कोल्हापूर विद्यापीठाचे रासेयो संचालक तानाजी चौगुले, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य गुरुदास कामडी, प्रशांत मोहिते, प्रा.डॉ. विवेक जोशी, गोंडवानाचे परीक्षा संचालक डॉ. दिनेश नरोटे आदी उपस्थित होते. या साेहळयात राज्यपाल रमेश बैस यांनी आभासी पध्दतीने मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांसह राष्ट्रीय आपदा मोचन बल बलाचे सहाय्यक समादेशक प्रवीण धट यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. श्याम खंडारे, संचालन डॉ. शिल्पा आठवले यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले. यशस्वीतेसाठी सह समन्वयक डॉ. प्रिया गेडाम यांच्यासह विद्यापीठातील सर्व शिक्षक तसेच  शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केले.

बाॅक्स .....आपत्तीच्या वेळी कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची?या शिबिरात पूर, संर्पदंश, अपघात, हृदयविकार, आग, भुकंप आदी आपत्तीच्या वेळी कोणत्या प्रकारची काळजी घेवून जिवित व वित्तहानी टाळता येईल. याबाबतचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण दिले जाणार आहे. रोज योगा, मेडीटेशन, आपत्ती व्यवस्थापनाचे वर्ग, आपातकालीन परिस्थतीत लढण्याची पूर्वतयारी, आग नियंत्रित  करण्याच्या विविध पध्दती, पुरपरिस्थीती हाताळण्याचे प्रशिक्षण, मोटीव्हेशनल स्पीच असा दिवसभराचा कार्यक्रम राहणार आहे.

प्रात्याक्षिकही हाेणारवर्गखोलीतील शिक्षणाशिवाय गडचिरोलीतील स्थानिक तलाव, विद्यापीठ  कॅम्पस परिसरात बिल्डींग डिझास्टर ऑपरेशन यांची रंगीत तालीम घेण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. ३१ डिसेंबर रोजी सुमानंद सभागृह ते इंदिरा चौक अशी रॅली काढण्यात येणार आहे.

प्रत्येक आपत्तीतून भारत सुरक्षित आणि विकसित करण्यासाठी पुढाकार घ्या - राज्यपाल गेल्या काही वर्षांत, भारताने आपत्तींना प्रतिसाद देण्यामध्ये, विशेषत: आपत्तीपूर्व शमनामध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. सरकार सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यासाठी सज्ज आहे. आपत्ती व्यवस्थापनात विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. विद्यार्थी आपत्तीबाबत जागरूकता पसरविण्यात मदत करू शकतात. आपत्तीसाठी तयार राहण्याच्या महत्त्वाबद्दल ते त्यांचे मित्र, कुटुंब आणि समुदाय सदस्यांना महत्त्वाचे संदेश देऊ शकतात. सामूहिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये स्वभावाने मोठे धैर्य आणि तग धरण्याची क्षमता असते. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे समाजाला मोठ्या गरजेच्या वेळी खूप मदत होते. प्रत्येक आपत्तीतून भारत सुरक्षित आणि विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केले.

प्रशिक्षणाचा फायदा हाेईल : कुलगुरु डॉ. बोकारेआपदा प्रबंधनाचे प्रमुख कारण हे मानवनिर्मित असते. याचा नीट मुकाबला करण्यासाठी सुद्धा प्रशिक्षण देण्याची गरज असते. आपदा प्रबंधनाचे धडे हे सामान्य नागरिकांना दिले तर जीवित आणि वित्त होणार नाही. दहा दिवस होणाऱ्या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी चांगला उपयोग करून घ्यायचा आहे. यातून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनासाठी त्यांच्या जिल्ह्यात पाठवण्यात येणार आहे. या प्रशिक्षणातून विद्यार्थी आपल्या जिल्ह्यात जाऊन आपत्ती व्यवस्थापनाचे काम करतील आणि त्याचा फायदा समजला होईल, असा आशावाद कुलगुरू डाॅ. बाेकारे यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली