शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

थेट नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची वानवा

By admin | Updated: May 13, 2016 01:33 IST

राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय जाहीर केला.

नगण्य संख्या : गडचिरोली व देसाईगंजमध्ये मोर्चे बांधणीला वेगगडचिरोली : राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे विविध राजकीय पक्षांसमोर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी राजकीय पक्षाकडे एक ते दोनच चेहरे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी दिसून येत आहे.गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज या दोन नगर पालिका आहेत. देसाईगंज ही सर्वात जुनी जिल्हा निर्मितीच्या आधीची नगर पालिका आहे. देसाईगंज येथे सध्या १७ वॉर्ड असून गेल्यावेळी चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग होता. यावेळी दोन वॉर्डांचा मिळून एक प्रभाग राहणार आहे. देसाईगंजची मतदारांची संख्या २०११ च्या लोकसंख्येनुसार २८ हजारांच्या घरात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी येथे एक वॉर्ड वाढण्याची शक्यता असून वॉर्डाची संख्या १८ वर जाण्याची स्थिती आहे. येथे नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे या नगराध्यक्षपदावर कुठल्याही प्रवर्गाचा व्यक्ती निवडणूक लढवू शकतो. काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रस, भारतीय जनता पार्टी व शिवसेना हे प्रमुख चार पक्ष निवडणुकीच्या रिंगणात राहतील. काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणूून सध्या चर्चेत आहे. मात्र काँग्रेसच्या जिल्हास्तरावरील नेत्यांकडूनही आणखी काही नाव समोर आणले जाऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाकडून पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, मोतीलाल कुकरेजा, तालुकाध्यक्ष राजू जेठाणी यांची नावे चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना, बहुजन समाज पार्टी व काही आघाड्या येथे आपले उमेदवार उतरवू शकतात. मात्र सर्वच राजकीय पक्षाकडे उमेदवारांची प्रचंड वानवा असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली नगर पालिकेत २३ नगर सेवक आहेत. येथे नगर सेवकांची संख्या वाढण्याची शक्यता कमी आहे. ४५ हजार लोकसंख्या असलेल्या गडचिरोली शहरात ३५ हजारांवर मतदारही आहेत. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची लाट असतानाही काँग्रेस फक्त पाच ते सहा हजारांच्या फरकाने या ठिकाणी मागे होती. यावेळी काँग्रेस पक्ष नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मजबूतपणे उतरण्याची तयारी करीत आहे. भारतीय जनता पक्षाच्या खासदार व आमदारांचे गडचिरोली शहराच्या समस्यांकडे २०१४ पासून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. याचा मोठा लाभ घेण्यासाठी काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयारीला लागला आहे. येथील नगराध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. भारतीय जनता पक्षाकडून पक्षाचे प्रदेश सदस्य प्रमोद पिपरे, शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार यांची नावे सध्या चर्चेत आहे. काँग्रेसतर्फे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश विधाते, काँग्रेसचे जिल्हा महासचिव नरेंद्र भरडकर यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार तर स्वतंत्र आघाडीतर्फे प्रा. राजेश कात्रटवार, नगर सेवक आनंद श्रृंगारपवार यांचे नावही नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. एकूणच गडचिरोली शहरातही राजकीय पक्षांजवळ उमेदवार म्हणून एक ते दोनच नाव असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. चाचपणी इच्छुकांनी सुरू केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)एक कोटीवर खर्च पोहोचण्याची शक्यतानिवडणूक व पैसा हे समिकरण प्रचंड प्रमाणात वाढले असल्याने थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे बजेट एक कोटीच्या वर राहील, असे राजकीय जाणकार सांगतात. निवडणुकीच्या वैध खर्चापेक्षा उमेदवाराचे बजेट यावेळी मोठे ठेवावे लागणार आहे. त्यामुळे आर्थिक क्षमता मजबूत असलेले उमेदवार शोधण्याचे मोठे काम राजकीय पक्षाला करावे लागणार आहे. त्यासाठी आतापासून उमेदवार शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे. अनेकांनी प्रचाराचे फंडेही तयार केले आहे.