शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

बियाण्यांसाठी आता थेट अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:14 IST

अनुदानावर शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाºया बियाणांसाठी यावर्षीपासून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पहिल्यांदाच थेट अनुदान योजना सुरू केली आहे. धानावर ७००, तूर १०० व सोयाबिन बियाण्यांवर जास्तीत जास्त १ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा नावीन्यपूर्ण उपक्रम । सातबारा, आधारकार्ड व बँक पासबुकची गरज

दिगांबर जवादे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अनुदानावर शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाºया बियाणांसाठी यावर्षीपासून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पहिल्यांदाच थेट अनुदान योजना सुरू केली आहे. धानावर ७००, तूर १०० व सोयाबिन बियाण्यांवर जास्तीत जास्त १ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.१३ वने ७ टक्के वन महसूल अंतर्गत जिल्हा परिषदेला निधी उपलब्ध होते. या निधीतून जिल्हा परिषद महाबिजकडून बियाणे खरेदी करून सदर बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून दिले जात होते. या योजनेत शेतकºयाला जिल्हा परिषद उपलब्ध करून देईल, तेच बियाणे खरेदी करावे लागत होते. बºयाचदा दुसºया वाणाची लागवड करायची असल्याने शेतकरी इच्छा असूनही अनुदानावरील बियाणे खरेदी करीत नव्हते. तसेच महाबिजकडील बियाणे उगविल्या नसल्याच्या तक्रारीही वाढल्या होत्या.जिल्हा परिषदेचे कृषी सभापती नाना नाकाडे यांनी यातून मार्ग शोधत बियाणांचे अनुदान थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची योजना यावर्षीपासून सुरू केली आहे.धानाच्या बियाण्यांसाठी ११ लाख रुपये, तुरीच्या बियाण्यांसाठी ४ लाख रुपये व सोयाबिनच्या बियाण्यांसाठी १ लाख रुपये अनुदान मंजूर केला आहे. सदर अनुदानाची रक्कम पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाºयांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्याने बियाणे खरेदीचे बिल संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे सादर केल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात बियाण्यांवरील अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. या योजनेसाठी जे गावे वनव्याप्त आहेत, अशा गावांमधील शेतकरी पात्र ठरणार आहेत. शेतकऱ्यांना नोंदणीकृत कृषी केंद्रातून धान, तूर व सोयाबिन या पिकांचे जे वाण आवश्यक आहे, ते वाण खरेदी करू शकणार आहेत. जिल्हा परिषदेच्या या नाविन्यपूर्ण व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.अनुदानासाठी ही आहे प्रक्रियाआधार कार्ड, सातबारा व बँक पासबूकची झेरॉक्स घेऊन पंचायत समितीच्या कृषी विभागामध्ये जायचे आहे. ही सर्व कागदपत्रे दाखविल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला परिमिट दिले जाईल. शेतकºयाने परवानाधारक कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करायचे आहे. बियाणांचे ओरिजनल बिल पंचायत समितीच्या कृषी विभागात सादर करतील. परमिट दिल्यानंतर दोन दिवसातच बियाणे खरेदी करायचे आहे. त्यानंतर खरेदी केलेले बियाणे अनुज्ञेय राहणार नाही. पक्क्या बिलानुसार खरेदी किमतीच्या ५० टक्के किंवा धान बियाण्यांवर ७०० रुपये, तूर बियाण्यांवर १०० रुपये तर सोयाबिन बियाण्यांवर १ हजार रुपये अनुदान दिले जाईल. एखाद्या शेतकºयाने तिन्ही प्रकारचे बियाणे खरेदी केले तर त्याला तिन्ही बियाण्यांवर अनुदान देय राहिल.

टॅग्स :Farmerशेतकरीzpजिल्हा परिषद