शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील गरोदर व बाळंत महिलांना 10 कोटी 95 लाखांची थेट मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST

आर्थिक अडचणीमुळे प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता चांगली नसतानासुद्धा अनेक माता कामावर जातात. त्यामुळे बाळाचे योग्य पोषण न झाल्याने ते कुपोषित होते. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गरोदर व स्तनदा मातेस सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला आलेल्या नवजात बालकांचेही आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी मातृवंदना योजनेतून महिलेच्या बँक खात्यात तीन टप्प्यांत ५ हजार रुपये टाकले जातात. याशिवाय जननी सुरक्षा योजनेतून ५ हजार ७०० रुपये अतिरिक्त लाभ दिला जातो.

ठळक मुद्देमातृवंदना योजनेचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण; जननी सुरक्षा याेजनेचाही लाभ

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे प्रपंच चालविण्यासाठी अनेक महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आणि प्रसूतीनंतरही लगेच कामावर जावे लागते. अशा स्थितीत त्या महिलेचे आणि बाळाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी गरोदर आणि बाळंत महिलांना सकस आहारासाठी थेट आर्थिक लाभ दिला जात आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना आणि जननी सुरक्षा योजनेतून यावर्षी १० कोटी ९५ लाखांची मदत संबंधित महिलांना करण्यात आली आहे.गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत काम करण्याची वेळ येऊ नये आणि आली तरी आरोग्य, आहार याची हेळसांड होऊ नये म्हणून हा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा उद्देश आहे. आर्थिक अडचणीमुळे प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता चांगली नसतानासुद्धा अनेक माता कामावर जातात. त्यामुळे बाळाचे योग्य पोषण न झाल्याने ते कुपोषित होते. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गरोदर व स्तनदा मातेस सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला आलेल्या नवजात बालकांचेही आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी मातृवंदना योजनेतून महिलेच्या बँक खात्यात तीन टप्प्यांत ५ हजार रुपये टाकले जातात. याशिवाय जननी सुरक्षा योजनेतून ५ हजार ७०० रुपये अतिरिक्त लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटच्या मासिक पाळीच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत सर्व कागदपत्रे जमा करणे आवश्यक असते.  जिल्ह्याच्या दुर्गम भागात अनेक महिलांना याची माहितीच नसते; पण त्या भागातील आशा आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या योजनेचे लाभार्थी वाढले आहेत. माता व बाल मृत्यूदर कमी करण्यास ही योजना कारणीभूत ठरली असल्याचे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. समीर बनसोडे यांनी सांगितले. पहिले बाळंतपण असणाऱ्या अधिकाधिक मातांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कार्यक्रम समन्वयक अश्विनी मेंढे यांच्याशी संपर्क करून नोंदणी करावी.

क्यूआर कोड स्कॅनरचे वाटप जिल्ह्यातील प्रथम गरोदर व स्तनदा मातांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ४ मार्च २०२१ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांच्या हस्ते सर्व १२ तालुक्यांमध्ये क्यूआर कोड स्कॅनर मशीनचे वाटप करण्यात आले. या मशीनच्या आधारे लाभार्थीचे आधार कार्ड स्कॅन केले जाते. त्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यास आणखीच सोईचे होईल, असे डॉ. शंभरकर यांनी सांगितले.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याकरिता राज्यस्तरावरून २५ हजार ९६० महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात २६ हजार २८६ महिला गरोदर व स्तनदा मातांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात हे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. सर्व लाभार्थ्यांच्या बँक अथवा पोस्ट खात्यामध्ये १० कोटी ९५ लाखांची रक्कम जमा करण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

 

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाgovernment schemeसरकारी योजना