शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अंकिसाच्या तलावाला इकॉर्नियाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 05:00 IST

सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता नदी आहे. याशिवाय लहान नद्या आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये बोअर मारून तसेच विहिरी खोदून पाण्याची व्यवस्था केली आहे. या माध्यमातून शेतकरी उन्हाळी धानपीक, मका, मिरची, भाजीपाल्यासह विविध पिके घेतात. गावालगत दोेन तलाव असल्याने या तलावांचा दरवर्षी लिलाव स्थानिक प्रशासनामार्फत केला जातो.

ठळक मुद्देपाणी साठवणुकीवर परिणाम, मासेमारीस अडचण

n  लाेकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे दोन तलाव आहेत. या तलावाचा दरवर्षी लिलाव होतो. लिलावानंतर काही नागरिक मासे सोडतात. परंतु संपूर्ण तलावाला इकॉर्निया वनस्पतीने विळखा घातल्याने तलावातील पाणी साठवणुकीवर परिणाम होत आहे. शिवाय येथे मासेमारी करण्यास अडचणी येत आहेत.सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता नदी आहे. याशिवाय लहान नद्या आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये बोअर मारून तसेच विहिरी खोदून पाण्याची व्यवस्था केली आहे. या माध्यमातून शेतकरी उन्हाळी धानपीक, मका, मिरची, भाजीपाल्यासह विविध पिके घेतात. गावालगत दोेन तलाव असल्याने या तलावांचा दरवर्षी लिलाव स्थानिक प्रशासनामार्फत केला जातो. लिलावानंतर दरवर्षी पावसाळ्यात लिलावातून मालकी प्राप्त झालेले नागरिक येथे मत्स्यबीज टाकतात. दिवाळी व मकरसंक्रातीनंतर या मत्स्यबीजाची बऱ्यापैकी वाढ होते. वाढ झाल्यानंतर मत्स्यबीजाची विक्री करण्याकरिता संबंधित नागरिक तलावातील मासे पकडतात. परंतु या तलावाला इकॉर्निया वनस्पतीचा विळखा असल्याने मासे पकडण्यासाठी योग्य प्रकारे जाळ टाकता येत नाही. सध्या संपूर्ण तलावात इकॉर्निया वनस्पती दिसून येते. सदर वनस्पती सध्या फुलली असल्याने उठावदार दृश्य दिसून येते. असे असले तरी या वनस्पतीमुळे तलावातील जलसाठा क्षमतेवर परिणाम होत आहे.जवळपास दोन ते तीन फूट ही वनस्पती वाढते. दरवर्षी एप्रिल महिन्यात फूल येऊन त्यातील बिया खाली गळतात. त्यानंतर दुसऱ्या वर्षी पुन्हा त्या उगवतात. विशेष म्हणजे एका वर्षी वाढलेली ही वनस्पती तलावात पूर्णत: कुजून मातीमोल होते. त्यामुळे तलावाच्या आतील भाग दरवर्षी उथळ होत असते. याचा परिणाम पाणी साठवणुकीवर होत आहे. या तलावातील गाळाचा उपसा करणे आवश्यक आहे. सोबतच पावसाळ्यानंतर विशेषत: जानेवारी महिन्यात फुले येण्याआधी या वनस्पतीची विल्हेवाट लावावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प