लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन न करताच बदली प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे या शिक्षकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शिक्षकांचे सर्वप्रथम समायोजन करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.आॅनलाईन बदलीची प्रक्रिया राबविण्यापूर्वी पटसंख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करणे आवश्यक होते. मात्र समायोजन न करताच बदल्यांची प्रक्रिया राबविली जात आहे. संबंधित शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करण्याचा सल्ला जिल्हा परिषदेने दिला आहे. मात्र त्यांना संबंधित शाळेत १० वर्षांची सेवा झाली नसल्याने त्यांचा अर्ज बदली पोर्टल स्वीकारत नाही. त्यामुळे बदलीसाठी अर्ज करणे शक्य नाही. जिल्हा परिषद आता इतर शिक्षकांच्या बदल्या करून घेईल. त्यानंतर उर्वरित जागांवर या अतिरिक्त शिक्षकांना समुपदेशन करून पाठवले जाणार आहे. काही शिक्षक अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात आल्याला एक ते दोनच वर्ष झाले आहेत. मात्र त्यांची पुन्हा रवानगी भामरागड, सिरोंचा, एटापल्ली या दुर्गम भागात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास त्यांच्यावर फार मोठा अन्याय असेल. त्यामुळे जिल्हा परिषदेने ३० सप्टेंबर २०१८ च्या संचमान्यतेनुसार सर्वप्रथम अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे. त्यानंतरच बदली प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अतिरिक्त शिक्षकांची अडचण वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 23:47 IST
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन न करताच बदली प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे या शिक्षकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शिक्षकांचे सर्वप्रथम समायोजन करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.
अतिरिक्त शिक्षकांची अडचण वाढली
ठळक मुद्देसमायोजन केलेच नाही : पुन्हा अवघड क्षेत्रात द्यावी लागणार सेवा