शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसामुळे धान पेरणीच्या कामात वाढल्या अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 05:00 IST

शेतकरी साधारणपणे मे महिन्यात शेतातील आंतरमशागतीची कामे आटोपून जून महिन्यात मृग नक्षत्राचा पाऊस आल्यावर धान पेरणी करू, असा बेत आखत होते. मात्र, गतवर्षी मृगाचा अपेक्षित पाऊस आला नाही. त्यामुळे पेरणीचे काम आद्रा नक्षत्रात करावे लागले होते. या वर्षी मात्र मृग नक्षत्र सुरू झाले, तेव्हापासून अधूनमधून पाऊस येत आहे, त्यामुळे भातखाचरात  अधिक ओलावा आहे. अशा अवस्थेत धान पेरणी करणे शेतकऱ्यांना अवघड जात असते.

ठळक मुद्देभातखाचरात अधिक ओलावा, प्रतीक्षा वाढली

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यात मृगाचा अधूनमधून पाऊस येत असल्याने धान पेरणीचे काम अडचणीत आले असून, शेतकरी धान पेरणी करण्यासाठी पावसाची उसंत मिळेल, या आशेवर असून, मृगाचा अर्धा चरण संपण्याच्या मार्गावर असताना पेरणीचे काम अजूनही झाले नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे .शेतकरी साधारणपणे मे महिन्यात शेतातील आंतरमशागतीची कामे आटोपून जून महिन्यात मृग नक्षत्राचा पाऊस आल्यावर धान पेरणी करू, असा बेत आखत होते. मात्र, गतवर्षी मृगाचा अपेक्षित पाऊस आला नाही. त्यामुळे पेरणीचे काम आद्रा नक्षत्रात करावे लागले होते. या वर्षी मात्र मृग नक्षत्र सुरू झाले, तेव्हापासून अधूनमधून पाऊस येत आहे, त्यामुळे भातखाचरात  अधिक ओलावा आहे. अशा अवस्थेत धान पेरणी करणे शेतकऱ्यांना अवघड जात असते. सध्या भातखाचरात नांगरणी केली असल्याने सखल भागात पाणी साचून शेत जमिनीत दलदल झाली आहे. त्यामुळे पेरणी काम अशा परिस्थितीत केले जात नाही, म्हणून शेतकरी मृगाचा शेवटच्या चरणात तरी पेरणी करू, या आशेवर दिवस मोजत आहेत. मृगाच्या पावसात केलेल्या पेरण्या शेतीला सुबक अशा असतात. मात्र, पावसाने उसंत घेऊन कडक उन्ह लागल्यास पेरणीचे काम करण्यासाठी सोयीचे होत असते. यासाठी शेतकरी बी-बियाणे यांची सोय करून ठेवली आहे, तर काही शेतकरी बी-बियाणांच्या वाढत्या किमतीमुळे  घरगुती बियाणे वापरण्यासाठी बियाणे पेरणीलायक करीत आहेत. तालुक्यातील काही भाग वगळता खरिपातील पीक हे वरच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी जमिनीत अपेक्षित ओलावा प्राप्त झाल्यानंतर पेरणीचे काम करीत असतात. 

यंदा तुर्तास नियाेजन ढासळलेबी-बियाणे यांच्या किमती दरवर्षी वाढत जात असतात. त्यामुळे पीक लागवड खर्च वाढत चालला आहे. मात्र, हमीभाव त्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे शेती हा व्यवसाय तोट्यात आला. सध्या शेती करणे परवडणारे नाही, तरीही एक व्यवसाय म्हणून शेतकरी शेती करतात. यासाठी शेतकरी दरवर्षी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून बॅंकाकडून कर्ज घेत असतात. काही शेतकरी कारभारणीचे दागिने गहान ठेवून पीक लागवड करीत असतात. या वर्षी शेतकऱ्यांना बोनस मिळाले नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळलेले आहे.

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी