शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

अडीच वर्षांपासून धानोरा-रांगी-वैरागड मार्ग अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST

रांगी : धानोरा-रांगी-वैरागड मार्गाचे रूंदीकरण,मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याकरिता मे २०१८ मध्ये कंत्राटदाराने सोडे गावापासून खोदकाम सुरू केले. जवळपास अडीच ...

रांगी : धानोरा-रांगी-वैरागड मार्गाचे रूंदीकरण,मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याकरिता मे २०१८ मध्ये कंत्राटदाराने सोडे गावापासून खोदकाम सुरू केले. जवळपास अडीच वर्षाचा कालावधी उलटून अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या मार्गाने आवागमन करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर टाकलेल्या गिट्टीमुळे रहदारीस अडथळा येत आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

धानाेरा-वैरागड मार्गाचे प्रत्यक्ष काम मे २०१८ सुरू करण्यात आले. खोदकाम केल्यानंतर कालांतराने पावसाळा सुरु झाला. नंतर काही तांत्रिक अडचणी आल्या. यातच रस्ताच वाहून गेला. मार्च २०२० पासून करोना संसर्गामुळे सर्व ठप्प पडले. धानोरा-रांगी-वैरागड मार्गाचे काम अशाही स्थितीत सोडे ते मोहली पर्यंत जून-जुलै २०२० मध्ये सुरू करण्याकरिता गिट्टी टाकून पसरविण्यात आले. परंतु काम झाले नाही. कठिण परिस्थितीत मोठी कसरत करुत वाहने चालवावी लागत आहेत. सध्या मोहली-रांगी-विहीरगाव या १८ कि.मी.मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. गिट्टी बाहेर निघाली आहे. कंत्राटदारांच्या दुर्लक्षित पणामुळे मागील अडीच वर्षांपासून या मार्गावरील रहदारी बंद झाली आहे.

महाराष्ट्र शासनाने धानोरा-रांगी-वैरागड-ठाणेगाव या ४० कि.मी.अंतराचे रुंदीकरण व मजबुतीकरिता निविदा काढली. याचे कंत्राट खाजगी कंपनीला देण्यात आले. धानोराबाजूने काम करण्याकरिता सोडे गावापासून मोहली गावापर्यंत संपूर्ण रस्ता खोदण्यात आला. मात्र प्रत्यक्ष २०१९ पर्यंत कामाला सुरूवात करण्यात आली नाही. या मार्गाचे लवकर काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स

बसफेरी बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल

धानाेरा-रांगी-वैरागड मार्गाने दररोज जड वाहने ये-जा करतात. जड वाहनांमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मात्र याची दखल लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी घेतली नाही. विशेष म्हणजे, या मार्गावरील बसफेरी बंद पडल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे कठिण झाले आहे. त्यांचे हाल हाेत आहेत. सोबतच रांगी ते आरमोरी मार्गावर पावसामुळे भगदाड पडल्याने हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. उन्हाळ्यात रस्त्याचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा लोकांना हाेती परंतु मागील वर्षी रस्त्याचे काम सुरू झाले नाही. सध्या या मार्गावर गिट्टी पसरवली असल्यामुळे नागरिकांना लोहारा ते रागी मार्गाने ये-जा करणे बंद झाले आहे. रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना त्रास हाेऊ नये म्हणून प्रशासनाने लवकर काम मार्गी लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.