शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आठ ड्रम गुळ सडवा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 21:46 IST

सिरोंचा पोलिसांनी एकूण २४ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. अमरावती या गावात जवळपास २० जण दारू गाळून त्याची विक्री करतात. यातील अनेकांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली. महिनाभरातच तीन ते चार वेळा अमरावती गावात पोलिसांनी धाड टाकून दारूसाठा व सडवा ताब्यात घेतला आहे. तरीही मोहफूल विक्री सुरूच आहे. गावातील काही विक्रेत्यांनी सडवा टाकल्याची माहिती ग्रामस्थांनी मुक्तिपथ तालुका चमूला दिली.

ठळक मुद्देतीन विक्रेत्यांना अटक : अमरावती व माणिक्यापूर येथे पोलिसांची धाड

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील अमरावती व माणिक्यापूर या गावांमध्ये मुक्तिपथ तालुका चमू आणि पोलिसांनी संयुक्तपणे वेगवेगळ्या आठ घरी धाड टाकली. यामध्ये पाच घरी आठ ड्रम गुळाचा सडवा सापडला. हा साठा नष्ट करून तीन दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली.सिरोंचा पोलिसांनी एकूण २४ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. अमरावती या गावात जवळपास २० जण दारू गाळून त्याची विक्री करतात. यातील अनेकांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली. महिनाभरातच तीन ते चार वेळा अमरावती गावात पोलिसांनी धाड टाकून दारूसाठा व सडवा ताब्यात घेतला आहे. तरीही मोहफूल विक्री सुरूच आहे. गावातील काही विक्रेत्यांनी सडवा टाकल्याची माहिती ग्रामस्थांनी मुक्तिपथ तालुका चमूला दिली. त्यांनी सिरोंचा पोलिसांच्या सहकार्याने येथील चार घराची तपासणी केली. यातील दोन घरी चार ड्रम गुळाचा सडवा पोलिसांना आढळला. हा सर्व साठा पोलिसांनी नष्ट करून दोघांवर कारवाई केली.पेंटिपाका महसूल गावांतर्गत येणाऱ्या माणिक्यापूर या गावीही अशाच प्रकारे दारू गाळणाऱ्यांनी घरच्या आवारात सडवे टाकल्याची माहिती गावकºयांकडून मुक्तिपथ चमूला मिळाली. या गावीही पोलिसांसोबत धाड टाकून चार घरे हुडकून काढली. यातील तीन घरातून चार ड्रम गुळाचा सडवा सापडला. हा सर्व मुद्देमालही पोलिसांनी नष्ट केला. यावेळी दोन विक्रेत्यांनी पळ काढला तर एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोनही कारवायांमध्ये एकूण २४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेऊन नष्ट केला.सदर कारवाई सिरोंचाचे पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांच्या मार्गदर्शनात बीट अंमलदार दिलीप बोडे, बोरगडे व मारा मडावी यांनी केली. तालुक्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. दारूमुळे लोक एकमेकांच्या संपर्कात येत असल्याने हा धोका आणखी वाढला आहे. त्यामुळे दारू गाळणे थांबविण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. मुक्तिपथ संघटक सुनीता भगत व प्रेरक संतोष चंदावार यांनी कारवाईस सहकार्य केले. कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस