शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

मंजूर हाेऊनही ७०० वर विद्यार्थ्यांना वाहतूक भत्त्याचा लाभच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST

गडचिराेली : नजीकच्या क्षेत्रात शाळा उपलब्ध नाही, अशा भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने वाहतूक भत्ता, वाहतूक सुविधा उपलब्ध ...

गडचिराेली : नजीकच्या क्षेत्रात शाळा उपलब्ध नाही, अशा भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने वाहतूक भत्ता, वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान दिले जाते. प्रतिमाह ३०० रुपयांप्रमाणे प्रवासभत्ता मंजूर हाेऊनही शासनाकडून ते अनुदान न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील ७०० वर विद्यार्थी वाहतूक भत्त्यापासून वंचित आहेत.

विशेष म्हणजे गतवर्षीचे ४२०पेक्षा अधिक व यावर्षीच्या २६८ विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने मंजूर करण्यात आला हाेता. विद्यार्थ्यांना या याेजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत अनुदान स्वरूपात निधी उपलब्ध हाेईल, अशी अपेक्षा शिक्षण विभागाची हाेती. मात्र, शासनाकडून अनुदानाचा एकही रुपया प्राप्त झाला नाही. काेराेनामुळे यावर्षी सदर याेजनेकरिता निधी उपलब्ध नसून अनुदान मिळणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे शिक्षण विभागाला देण्यात आली.

स्वत:च्या गावापासून शाळेपर्यंत सायकलने किंवा पायी, तसेच खासगी वाहनाने दरराेज ये-जा करणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ३०० रुपये अनुदान देण्याची शासनाची ही याेजना आहे. गतवर्षी ४२० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मंजूर करण्यात आला. मात्र, शासनाकडून अनुदानच प्राप्त न झाल्याने पात्र विद्यार्थी अनुदानाच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

यावर्षी सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रात जिल्हाभरातील एकूण ४२३ लाभार्थी या याेजनेसाठी निश्चित झाले हाेते. काेराेनामुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा पूर्णत: बंद आहेत. इयत्ता पाचवी ते आठवीच्या एकूण २६८ विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मंजूर करण्यात आला. एकूण ४२३ विद्यार्थी आपल्या गावापासून ते शाळेच्या गावापर्यंत ये-जा करणारे आहेत. यापैकी २६८ विद्यार्थी या भत्त्यासाठी पात्र झाले. मात्र, शासनाकडून अनुदान प्राप्त न झाल्याने त्यांना लाभ मिळाला नाही.

दाेन वर्षांतील मिळून गडचिराेली जिल्ह्यातील ७०० पेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक भत्ता मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

बाॅक्स

पालकांमध्ये नाराजी

स्वत:च्या गावात शाळा नाही. महामंडळाची माेफत एसटी बस सुविधा नाही. अशा स्थितीत अनेक गावांतील विद्यार्थ्यांना सायकलने किंवा पायी शाळा असलेल्या गावात दरराेज जावे लागते. काही विद्यार्थी खासगी वाहनाने प्रवास करून शाळेत हजेरी लावतात. अप-डाऊन करणाऱ्या अशा विद्यार्थ्यांची शाळेतील पटावरील उपस्थिती टिकून राहावी, यासाठी शासनाने वाहतूक भत्ता देण्याची याेजना अमलात आणली. मात्र, यंदा शासनाने विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी निधी न दिल्याने बऱ्याच पालकांमध्ये नाराजी पसरली आहे.