देसाईगंज : मागील २० वर्षांपासून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कॅम्प कुरखेडा या नावाने देसाईगंज शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आहे. कुरखेडा येथे पोलीस ठाण्याच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. याच इमारतीत देसाईगंज येथील एसडीपीओ कार्यालय स्थानांतरीत होणार असल्याच्या हालचाली वाढल्या आहेत. तसेच या संदर्भात देसाईगंज शहरात सर्वत्र जोरदार चर्चा आहे. १ एप्रिल १९९५ पासून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कॅम्प कुरखेडा या नावाने एसडीपीओ कार्यालय देसाईगंज शहरात आहे. या कार्यालयाचे पहिले उपविभागीय अधिकारी म्हणून छगन वाकडे यांनी काम पाहिले होते. सुरूवातीपासूनच कुरखेडा कॅम्पच्या नावाने देसाईगंजात एसडीपीओ कार्यालय सुरू आहे. शहर भौगोलिक व औद्योगिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण असून महत्त्वाचे शहर आहे. (वार्ताहर)
देसाईगंजचे एसडीपीओ कार्यालय कुरखेडाला जाणार?
By admin | Updated: June 22, 2015 01:30 IST