शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

दुधबावरे चामोर्शी पं.स.च्या उपसभापती

By admin | Updated: September 22, 2015 02:45 IST

स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात उपसभापती पदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत

दिगांबर जवादे ल्ल गडचिरोलीजिल्हा नियोजन विभागाने जिल्हा निर्मितीनंतर पहिल्यांदाच पर्यटनस्थळांच्या विकासाबाबतचा विस्तृत आराखडा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास आॅगस्ट महिन्यात सादर केला आहे. या आराखड्यात जिल्ह्यातील ४० पर्यटनस्थळांचा समावेश आहे. त्यापैकी सहा पर्यटनस्थळांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असून शासनाकडून निधी प्राप्त होताच या पर्यटनस्थळांच्या विकासाची कामे केली जाणार आहेत. ८० टक्के जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक, धार्मिक व नैसर्गिक स्थळे आहेत. निसर्गाच्या वातावरणात सदर स्थळे असल्याने या स्थळांचे सौंदर्य इतर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या तुलनेत निश्चितच वेगळे आहे. मात्र आजपर्यंत शासनाने पर्यटन विकासासाठी पाहिजे त्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे सदर स्थळांचा विकास होऊ शकला नाही व ही स्थळे दुर्लक्षित राहिली होती. दोन वर्षांपूर्वी क्रिएटीव्ह सर्कल या संस्थेच्या वतीने जिल्हाभरातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देऊन अभ्यास करण्यात आला. प्रत्येक स्थळावर नेमक्या कोणत्या बाबीची गरज आहे, हे ठरविण्यात आले व याचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात गडचिरोली जिल्ह्यातील ४० स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. २० आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी रणजितकुमार व जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा सादर करण्यात आला आहे. या आराखड्यात संपूर्ण ४० ही पर्यटनस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांची विस्तृत माहिती आराखड्यात सादर करण्यात आली आहे. यातील गडचिरोली, चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा, चपराळा देवस्थान, सिरोंचा तालुक्यातील सोमनूर व नगरम, भामरागडजवळील त्रिवेणी संगम या सहा स्थळांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. निधी प्राप्त होताच या ठिकाणी विकासाची कामे केली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे यांनी दिली आहे. आराखड्यात समाविष्ट पर्यटन स्थळे४गडचिरोलीतील तलाव, आरमोरी तालुक्यातील वैरागडचा किल्ला, गोरजाई मंदिर, आदिशक्ती देवी मंदिर, भद्रेश्वर मंदिर, पाच पांडव, चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव, कोठारी येथील बुध्दस्तूप, तुमडी येथील नारायण सेवाश्रम, संत जगन्नाथ महाराज धर्मशाळा मार्र्कंडा, कुरखेडा तालुक्यातील पलसगड येथील महादेव मंदिर, अरततोंडी येथील महादेवगड, देसाईगंज तालुक्यातील आमगाव बुटी येथील राम मंदिर, कुरूड गाव, मुलचेरा तालुक्यातील हनुमान मंदिर, चपराळा येथील प्रशांतधाम, अभयारण्य, कोरची तालुक्यातील कुमकोटी येथील राजमाता मंदिर, हनुमान मंदिर, खोब्रामेंढा, टिप्पागड, अहेरी तालुक्यातील सत्यदेवी, पाच पांडव मंदिर, लख्खामेंढा, प्राणहिता-बमर संगम, बमर-हितामार संगम, बमर मादाराम संगम, लगाम डॅम, भामरागड तालुक्यातील लोकबिरादरी प्रकल्प, भामरागड संगम, बिनागुंडा धबधबा, एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पेठा, धानोरा तालुक्यातील झाडापापडा येथील कुंवरदेव मंदिर, सिरोंचा तालुक्यातील सोमनूर, नगरम, हजरत अली हैदरशहा बाबा दर्गा, आलापल्ली येथील फॉरेस्ट विभाग नागदेवता, पातानिल, व्यंकटापूर, कुनकुडम टेकडी या ४० पर्यटनस्थळांचा समावेश आहे. पर्यटनस्थळी या सुविधा राहणार४नदी घाटाचा विकास केला जाणार आहे. या ठिकाणी बोट, बगिचा, सुरक्षिततेची साधने, लाईफ गार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचबरोबर शुध्द पाण्याची व्यवस्था, शौचालय, हॉटेल आदी सुविधा प्रामुख्याने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. चार टप्प्यात होणार विकास ४आराखड्यात नमूद ४० ही पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी शेकडो कोटी रूपयांची गरज आहे. एवढा मोठा निधी शासन एकाच वेळीच उपलब्ध करून देऊ शकत नाही. यासाठी चार टप्प्यात या स्थळांचा विकास करण्याचे ठरविण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १५ पर्यटनस्थळे राहणार आहेत. यातील सहा पर्यटनस्थळांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. या स्थळांचा विकास पाच वर्षांच्या आत केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ११ पर्यटनस्थळांचा विकास केला जाणार आहे. दुसरा टप्पा पुढचे पाच ते दहा वर्षांत राबविला जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात १० व चौथ्या टप्प्यात उर्वरित स्थळांचा विकास केला जाणार आहे. पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने गडचिरोली-मार्र्कंडा-चपराळा-सिरोंचा-सोमनूर-भामरागड असा सर्कीट तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास झाल्यानंतर याची माहिती ताडोबासह इतर महत्त्वाच्या व जवळच्या पर्यटनस्थळावर ठेवण्यात येईल. ही माहिती बघून पर्यटक किमान एका दिवसासाठी तरी गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेटी देण्यास तयार होतील. त्याचदृष्टीने सर्कीट तयार करण्यात आले आहे.- रणजितकुमार, जिल्हाधिकारी, गडचिरोलीजिल्ह्यात पर्यटनाला चांगला वाव आहे. शासनाकडे पर्यटनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच विकासकामांना सुरूवात होईल. किमान ३० ते ३५ कोटींचा निधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.- धनंजय सुटे, जिल्हा नियोजन अधिकारी, गडचिरोली