शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
2
हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
3
२५,०००,००० रुपयांची सॅलरी! बर्कशायर हॅथवेच्या CEO च्या कमाईनं वॉरेन बफे यांनाच टाकलं मागे
4
रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, मग प्रियकरासोबत... ८ वीतल्या मुलीचं भयंकर कृत्य!
5
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
6
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
7
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
9
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
10
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
11
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
12
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
13
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
14
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
15
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
16
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
17
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
18
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
19
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
20
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू बळीचे प्रकरण अंगलट, डॉक्टर कार्यमुक्त, आरोग्य सहायक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 13:55 IST

डेंग्यूच्या साथीने घेतले ४ बळी, ९४ रुग्ण पॉझिटिव्ह : अखेर कारवाई सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील लगाम, येल्ला येथे डेंग्यूचा प्रकोप झाल्याने आठ दिवसांत चौघांचा बळी गेला. सध्या या भागात ९४ रुग्ण डेंग्यूबाधित आहेत. याबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले. एका कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यास सेवेतून कार्यमुक्त केले असून, दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची विभागीय चौकशी सुरू केली आहे, यासोबतच दोन आरोग्य सहायकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

लगाम, येल्ला येथे ६ ऑगस्टला पहिला रुग्ण आढळला. मात्र, याची माहिती तेथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच लगाम प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्हा मुख्यालयाला कळविली नाही. त्यामुळे डेंग्यूची साथ पसरली. यातून नंतर लागोपाठ चार मृत्यू झाले, तर तब्बल ९४ रुग्णांचे रक्तचाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळले. यामुळे एकच खळबळ उडाली. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधल्यानंतर जिल्हा परिषदेचे सीईओ सुहास गाडे यांनी १४ ऑगस्ट रोजी लगामचे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. ओंकार कोल्हे यांना सेवेतून कार्यमुक्त केले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. गेडाम यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. यासोबतच मुरुमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक अशोक डोंगरवार व लगाम प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहायक लिंगाजी नैताम या दोघांना निलंबित केले आहे.

आपापल्या आरोग्य केंद्रांतील गावांमध्ये साथरोग पसरत असताना निष्काळजी केली, तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी याबाबत माहिती होताच गावात धाव घेतली होती, शिवाय चौकशी अहवाल सीईओंकडे सादर केला होता, त्यावरून ही कारवाई करण्यात आली.

सहपालकमंत्री म्हणाले, अहवाल मागविणारजिल्हा नियोजन समिती बैठकीत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला, त्यास उत्तर देताना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी उपरोक्त कारवाईची माहिती दिली. एकीकडे साथरोग पसरत असताना दुसरीकडे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मशाखेत्री यांना जिल्हा हिवताप अधिकारीपदाचा पदभार दिला जात होता. याबाबत बैठकीनंतर माध्यमांनी विचारले असता सहपालकमंत्री अॅड. जयस्वाल म्हणाले, या प्रकरणात सविस्तर अहवाल मागविणार असून, कोणाचीही गय करणार नाही.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली