वैरागड : कुरखेडा-भगवानपूर मार्गे जाणारी बसफेरी मार्च महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे सध्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. या मार्गे बसफेरी सुरू करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. भगवानपूर मार्गे बसफेरी सुरू हाेेती. परंतु काेराेना विषाणूचा संसर्ग वाढल्याने मार्च महिन्यापासून बसफेरी बंद करण्यात आली. त्यामुळे कढाेली येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कढाेली येथील श्री तुकाराम विद्यालयात इयत्ता नववी व बारावी व आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे वाढाेणा, भगवानपूर येथील विद्यार्थी पायी व सायकलने येत आहेत. विद्यार्थी वेळेवर पाेहाेचत नसल्याने नुकसान हाेत आहे. पायदळ येणे किंवा सायकलने येणे अडचणीचे ठरत आहे.
कुरखेडा-भगवानपूर मार्गे बसफेरी सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:51 IST