शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित शिक्षकांना हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:55 IST

स्थानिक पंचायत समिती अंतर्गत लक्ष्मीपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक नेहमी गैरहजर राहत असल्याने शाळा गुणवत्तेवर परिणाम होत आहे, असा आरोप करीत येथील कार्यरत शिक्षकांची इतर शाळेत बदली करून या शाळेत नवे कर्तव्यदक्ष शिक्षक देण्यात यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व पालकांनी केली आहे.

ठळक मुद्देकुलूप ठोकण्याचा इशारा : शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत लक्ष्मीपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक नेहमी गैरहजर राहत असल्याने शाळा गुणवत्तेवर परिणाम होत आहे, असा आरोप करीत येथील कार्यरत शिक्षकांची इतर शाळेत बदली करून या शाळेत नवे कर्तव्यदक्ष शिक्षक देण्यात यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व पालकांनी केली आहे.यासंदर्भात १९ आॅगस्ट रोजी सिरोंचा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर शाळा समितीचे अध्यक्ष श्रीनिवास कुम्मरी, बकय्या कुम्मरी, ग्रा.पं.सदस्य लक्ष्मी कुम्मरी, शाळा समितीचे सदस्य महेंद्र कुम्मरी, कुम्मरी पोचम, अर्चना कुम्मरी, बापू दुर्गम, मगडी राजय्या, राजबापू कोंडा, मदनय्या कुम्मरी आदींच्या स्वाक्षºया आहेत.गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर लक्ष्मीपूर हे गाव असून येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. लक्ष्मीपूर व परिसरातील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. मात्र येथील दोन शिक्षक गेल्या दोन महिन्यापासून सतत गैरहजर राहत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीनिवास कुमरी यांनी संबंधित शिक्षकांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शाळेतील एका शिक्षकाने पोलीस कारवाई करण्याची धमकी दिल्याचा आरोप कुमरी यांनी केला आहे.आपण विद्यार्थी हिताच्या दृष्टीने शिक्षकांना कर्तव्याबाबत सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या अरेरावीपणामुळे शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे सदर शिक्षकांना येथून हटवून लक्ष्मीपूर शाळेत नव्या शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी पदाधिकाºयांसह ग्रामस्थांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास लक्ष्मीपूर शाळेला कुलूप ठोकणार, असा इशारा पालकांनी दिला आहे.दुर्गम शाळांमध्ये एकच शिक्षक सांभाळतो वर्गसिरोंचा तालुका हा शेवटच्या टोकावर असून जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा अतिदुर्गम भागात आहेत. जि.प.शाळांमध्ये दोन पेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहेत. मात्र शाळेचे सर्व शिक्षक नियमित शाळेत जात नाही. परिणामी अदलाबदली पद्धतीने ड्यूटी बजावतात. एकच शिक्षक संपूर्ण शाळा सांभाळत असतो.

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक