शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

चाचण्या वाढल्याने अहवालास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 5:00 AM

जिल्ह्यात कोरोनासदृश लक्षणे दिसणाºया किंवा कोरोनाबाधित क्षेत्रातून आलेल्या ७४ लोकांना आतापर्यंत क्वारंटाईन ठेवले होते. त्यापैकी ५७ जणांनी १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला. या काळात त्यांची लक्षणे वाढली नसल्यामुळे वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मुक्त करण्यात आले. १७ जण अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन आहेत. दरम्यान सोमवारी आणखी ३ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

ठळक मुद्दे३७ नमुन्यांची तपासणी : ११ चे अहवाल येणे बाकी, जिल्हाधिकाऱ्यांची कुरखेडाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नसला तरी रुग्णालयीन क्वारंटाईन ठेवलेल्यांची संख्या वाढत आहे. त्यांचे नमुनेही तपासणीसाठी पाठविले जात आहे. इतरही जिल्ह्यातून तपासणीसाठी येणाºया नमुन्यांची संख्या वाढत असल्यामुळे नागपूर येथील प्रयोगशाळेवरचा ताण वाढला आहे. परिणामी नमुन्यांचे तपासणी अहवाल येण्यास विलंब होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अजून ११ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे.जिल्ह्यात कोरोनासदृश लक्षणे दिसणाºया किंवा कोरोनाबाधित क्षेत्रातून आलेल्या ७४ लोकांना आतापर्यंत क्वारंटाईन ठेवले होते. त्यापैकी ५७ जणांनी १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला. या काळात त्यांची लक्षणे वाढली नसल्यामुळे वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मुक्त करण्यात आले. १७ जण अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन आहेत. दरम्यान सोमवारी आणखी ३ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.बाहेरील जिल्ह्यातून येणाºया प्रवाश्यांची संख्या अजूनही वाढतच आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, सोमवारपर्यंत ही संख्या १६ हजार ६०८ झाली आहे. त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यापैकी २८७३ लोकांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण होणे बाकी आहे.जिल्हाधिकाऱ्यांकडून कुरखेडात पाहणीजिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कुरखेडा येथे भेट देवून पाहणी केली. यावेळी उपजिल्हा रूग्णालय, स्थलांतरीत लोकांसाठी तयार केलेला रिलीफ कॅम्प व क्वारंटाईन वार्ड या ठिकाणांची पाहणी केली. कुरखेडा येथे वेगवेगळ्या ठिकाणी तयार केलेल्या रिलीफ कॅम्पमध्ये १५७ लोकांचा समावेश आहे. यामध्ये परराज्यातील ६६, इतर जिल्ह्यातील ७०, जिल्ह्यातील वेगवेगळया तालुक्यातील ५ तर गोरगरीब गरजू १६ लोकांची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.ठिकाणी प्रशासनाबरोबर विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती तसेच सीएसआरमार्फत मदत देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सिंगला यांनी यावेळी कॅम्पमधील लोकांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान कुरखेडाचे तहसीलदार सोमनाथ माळी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षक, आणि महसूल अधिकारी उपस्थित होते.भेटीत जिल्हाधिकारी यांनी कोरोना संसर्गाबाबत तयार करण्यात आलेल्या अलगीकरण कक्षास भेट दिली. त्या ठिकाणी बेड, शौचालय सुविधा, पाणी व्यवस्था व इतर अनुषंगिक व्यवस्थांची पाहणी केली. शासकीय आदीवासी मुलींचे वसतिगृह कुरखेडा येथे कोरोना रूग्णांबाबत क्वारंटाईन वार्ड तयार करण्यात आला आहे. त्याठिकाणी आरोग्यविषयक सुविधांची पाहणीही त्यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या