शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
4
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
5
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
6
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
7
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
8
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
9
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
10
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
11
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
12
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
13
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
14
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
15
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
16
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
17
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
18
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
19
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
20
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

जीवंत तारांच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 01:14 IST

मका पिकाच्या संरक्षणासाठी लावलेल्या तारेच्या कुंपनाला विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. या कुंपनाच्या जीवंत तारेला स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मुलचेरा तालुक्यातील शेतात घडली. रमेश लक्ष्मण आत्राम (३१), दौलत बुच्चा मडावी (४१) दोघेही रा. मुलचेरा असे मृतकांची नावे आहेत.

ठळक मुद्देमक्यासाठी गेला जीव? : मुलचेरातील घटना

मुलचेरा : मका पिकाच्या संरक्षणासाठी लावलेल्या तारेच्या कुंपनाला विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. या कुंपनाच्या जीवंत तारेला स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मुलचेरा तालुक्यातील शेतात घडली.रमेश लक्ष्मण आत्राम (३१), दौलत बुच्चा मडावी (४१) दोघेही रा. मुलचेरा असे मृतकांची नावे आहेत. रमेश व दौलत हे दोघेही बुधवारच्या रात्रीपासूनच गायब होते. मात्र होळीचा सण असल्याने एखाद्या ठिकाणी गेले असावे, असा अंदाज घरच्यांनी बांधला. त्यामुळे रात्रभर त्यांची शोधाशोध केली नाही. मात्र गुरूवारी सकाळीही ते परत आले नाही. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी शोधाशोध घेतली असता, दोघांचेही मृतदेह रणजीत हलदार यांच्या शेतात आढळून आले.हलदार यांनी वन्यजीवांपासून मक्याच्या पिकाच्या संरक्षणासाठी शेतासभोवताल तारेचे कुंपन लावले होते. या कुंपनाला त्यांनी विद्युत प्रवाह सोडला होता. दोघांचाही तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शेतमालक रणजित हलदार व जयदेव हलदार यांच्यावर गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली. या दोघांच्याही विरोधात भादंवि कलम ३०४/३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रमेश आत्राम याला पत्नी, आई-वडील व दोन मुली आहेत. आई-वडील वयोवृध्द आहेत. दौलत मडावी याला मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. रंगपंचमीच्या दिवशी गावात घटना घडल्याचे उघडकीस आल्याने गावात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, दोघेही जनावरे शोधण्यासाठी गेले होते, अशी माहिती मृतकांच्या नातेवाईकांनी दिली. मात्र मक्याच्या शेतीत रात्री १० वाजता दोघेही गेल्याने ते मक्याची कणसे चोरण्यासाठी गेले असावेत अशी चर्चा गावकऱ्यांकडून केली जात आहे. अन्यथा तेवढ्या रात्री शेतात जाण्याचे दुसरे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शोधमोहिमेचा महावितरणला विसरकुंपनाला विजेचा प्रवाह सोडल्याने वन्यजीवांचा मृत्यू होतो. हे प्रकार थांबविण्यासाठी महावितरणने मागील वर्षी शोधमोहीम हाती घेतली होती. मात्र ही मोहीम काही दिवसांचा फार्स ठरली. यावर्षी मात्र शोधमोहीम राबविली जात नसल्याचे दिसून येत आहे. याचा गैरफायदा शेतकऱ्यांकडून घेतला आहे. शेतकºयांनी पिकांच्या संरक्षणाकरिता खुलेआम विद्युत प्रवाह सोडण्यास सुरूवात केली आहे.

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी