आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टीपासून १६ किमी अंतरावर असलेल्या मुधोली चेक नंबर २ येथे कार्यरत असलेले लाईनमन रमेश वारलू सुर्तीकर (४५) हे विजेच्या खांबावरून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी १०.३० वाजता घडली. रमेश सुर्तीकर हे वीज दुरूस्ती करण्यासाठी वीज खांबावर चढले असता त्यांना विजेचा धक्का लागून ते खाली पडले. विजेच्या धक्क्याने त्यांचे दोन्ही हात, पाय तसेच छातीचा भाग भाजल्या गेला. माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मर्ग दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक संदीप शिंगटे करीत आहेत. सुर्तीकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. (प्रतिनिधी)
खांबावरून पडल्याने लाईनमनचा मृत्यू
By admin | Updated: April 1, 2016 01:51 IST