शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अन् मृत बालकाला त्यांनी मध्यरात्री स्वत:च्या गाडीने पोहोचविले गावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:01 IST

लाहेरीजवळील बेंगरी गावातील राजू चूक्कु पुंगाटी हा बालक उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेताना मलेरियाने मरण पावला. सदर आदिवासी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच, त्यात संचारबंदी व लॉकडाऊनमुळे कुटुंबियांजवळ मृत बालकाला गावी घेऊन कसे जायचे असा यक्षप्रश्न निर्माण झाला. दु:खाचा डोंगर त्यांच्यासमोर होता.

ठळक मुद्देअंत्यसंस्कारासाठीही मदत : संजय झलिकरवार यांची सहृदयता

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : लॉकडाऊनच्या या काळात सर्वच व्यवहार बंद असल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात मलेरियाने मरण पावलेल्या एका बालकाच्या कुटुंबियांवरही बाका प्रसंग उद्भवला होता. पण येथील धर्मराव कृषी विद्यालयातील लिपिक आणि सामाजिक कार्यकर्ते संजय झलिकरवार यांनी पुढाकार घेत स्वत:च्या गाडीने त्या बालकाचा मृतदेह भामरागड तालुक्यातील बेंगरी येथे पोहोचविला. एवढेच नाही तर त्या गरीब कुटुंबाला बालकाच्या अंत्यसंस्कारासाठी आर्थिक मदतही दिली.लाहेरीजवळील बेंगरी गावातील राजू चूक्कु पुंगाटी हा बालक उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेताना मलेरियाने मरण पावला. सदर आदिवासी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच, त्यात संचारबंदी व लॉकडाऊनमुळे कुटुंबियांजवळ मृत बालकाला गावी घेऊन कसे जायचे असा यक्षप्रश्न निर्माण झाला. दु:खाचा डोंगर त्यांच्यासमोर होता. ही बाब संजय झलिकरवार यांना समजताच त्यांनी तात्काळ अहेरीच्या उपजिल्हा रु ग्णालयात धाव घेऊन मध्यरात्री २ वाजता कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता भामरागडसारख्या अतिदुर्गम लाहेरीजवळील बेंगरी गावात बालकाचा मृतदेह व मृतकाच्या कुटुंबियांना स्वत:च्या गाडीने सुखरूप पोहचविले.झलिकरवार यांच्या रूपाने साक्षात ईश्वरानेच आपल्याला मदत केल्याची प्रतिक्रि या मृतकाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवक