गडचिरोली : प्रशासनाच्यावतीने २२ सप्टेंबर हा दिवस जागतिक कार विरहित दिन म्हणून पाळण्याचे ठरविण्यात आले. या दिवशी समाजातील सर्वच स्तरावरील व्यक्तींनी आपल्या दैनंदिन कामासाठी कारने न जाता पायी अथवा सायकलने जावे, जेणे करून पर्यावरण संवर्धनाच्या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग होऊन इंधनाची बचत होईल. तसेच प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असे आवाहन सामाजिक वनिकरण विभागाचे उपसंचालक पी. आर. शिंगाडे व राष्ट्रीय हरीतसेना गडचिरोलीच्यावतीने करण्यात आले आहे. सध्या जागतिक तापमान वाढ व प्रदूषण हे दोन्ही प्रश्न जगातील सर्व शास्त्रज्ञांपूढील आव्हाने आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच जागतिक प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व नागरिकांनी २२ सप्टेंबर रोजी जागतिक कार विरहित दिन पाडवा, असे आवाहनही सामाजिक वनिकरण विभाग गडचिरोली व राष्ट्रीय हरीतसेना जिल्हा गडचिरोलीच्यावतीने करण्यात आले आहे. जागतिक कार विरहित दिन यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी सहकार्य करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
२२ ला जागतिक कार विरहीत दिन
By admin | Updated: September 16, 2014 23:43 IST