रवी रामगुंडेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : शेताच्या बाजुला असलेल्या जंगल परिसरात अवैध अतिक्रमण करण्यासाठी उभ्या झाडांना आग लावण्याचे प्रकार एटापल्ली तालुक्यात वाढले आहेत. यामुळे दरवर्षी शेकडो झाडे जळत असून हळूहळू जंगल नष्ट होण्याचा धोका वाढत आहे.तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेताला जंगल लागून आहे. जंगलावर अतिक्रमण करण्यासाठी जवळपासचे शेतकरी जंगलातील झाडाच्या खोडाजवळ चारही बाजुने साल काढतात. त्यामुळे वरच्या भागाला अन्नद्रव्यांचा पुरवठा होत नाही. परिणामी काही दिवसांनी सदर झाड पूर्णपणे वाळून जाते. त्यानंतर वाळलेल्या झाडाला बुडातूनच आग लावली जाते. आगीमुळे झाडाचे खोड जळून झाड कोसळते. कोसळल्यानंतरही आग सुरूच राहते. काही दिवसानंतर या लाकडाची पूर्णपणे राख होते. या पध्दतीने दरवर्षी तीन ते चार झाडे नष्ट केली जातात. या पद्धतीने झालेली वृक्षतोड वन विभागाच्या लक्षात येत नाही. मात्र शेकडो शेतकरी असा प्रकार करीत असल्याने दरवर्षी हजारो झाडे नष्ट होत आहेत. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास जंगल नष्ट होण्याचा धोका नाकारता येत नाही. वन विभागाने सर्वे करून ज्या शेतकºयाच्या शेताजवळ अशा प्रकारे झाडे जळत आहेत. अशा शेतकºयांवर कारवाई करावी, जेणेकरून असे प्रकार वाढीस लागणार नाही.जंगल भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना लाकडांची कमतरता नाही. त्यामुळे झाड सुकल्यानंतर त्याला तोडून घरी नेले जात नाही. तर त्याला आग लावली जाते. सदर आग कित्येक दिवस सुरूच राहते. वादळ वाºयामुळे झाडाला लागलेली आग जंगलात पसरून त्याचे वनव्यात रूपांतर होण्याची शक्यता राहते.उन्हाळ्याच्या दिवसात आगी लागू नये म्हणून वन विभागाने स्वतंत्र गस्ती पथक तयार केले आहे. मात्र सदर पथक सुध्दा संबंधित शेतकºयांवर कोणतीही कारवाई करीत नाही. वरिष्ठ अधिकाºयांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
जळत्या झाडांमुळे वनव्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST
तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेताला जंगल लागून आहे. जंगलावर अतिक्रमण करण्यासाठी जवळपासचे शेतकरी जंगलातील झाडाच्या खोडाजवळ चारही बाजुने साल काढतात. त्यामुळे वरच्या भागाला अन्नद्रव्यांचा पुरवठा होत नाही. परिणामी काही दिवसांनी सदर झाड पूर्णपणे वाळून जाते. त्यानंतर वाळलेल्या झाडाला बुडातूनच आग लावली जाते. आगीमुळे झाडाचे खोड जळून झाड कोसळते. कोसळल्यानंतरही आग सुरूच राहते.
जळत्या झाडांमुळे वनव्याचा धोका
ठळक मुद्देदरवर्षी शेकडो झाडांची कत्तल । अतिक्रमण करण्यासाठी शेतकऱ्यांची शक्कल