शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय शेतकऱ्यांच्या अपडाऊनमुळे गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 15:07 IST

तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांनी अहेरी परिसरात शेती केली आहे. सदर शेतकरी सातत्याने ये-जा करीत असल्याने त्यांच्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देअहेरी तालुक्यात भाड्याने घेतली आहे शेती तेलंगणातून ये-जा 

सुरेंद्र अलोणे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांनी अहेरी परिसरात शेती केली आहे. सदर शेतकरी सातत्याने ये-जा करीत असल्याने त्यांच्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. या शेतकऱ्यांवर प्रशासनाने प्रतिबंध घालावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातील शेतकरी अहेरी परिसरातील शेतकऱ्यांची शेती भाड्याने घेतात. या शेतीमध्ये टरबूज, कापूस, मिरची आदी नगदी पिकांची लागवड करतात. या माध्यमातून ते एकरी लाखो रुपयांचे उत्पादन घेतात. विशेष म्हणजे, पिकांसाठी मोठ्या प्रमाणात खत व कीटकनाशकांचा वापर करतात. त्यामुळे अल्पावधीतच जमीन नापिक होते. ही बाब स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. जास्त पैसे मिळतात, या लालसेने आपली शेती परप्रांतीय शेतकऱ्यांना कसण्यासाठी देतात.पिकांची लागवड केल्यानंतर परप्रांतीय शेतकरी तेलंगणा ते अहेरी तालुक्यात सतत ये-जा करतात. कोरोनामुळे जिल्हा व राज्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. तरीही सदर शेतकरी तेलंगणा राज्यातून नदीमार्गे सातत्याने ये-जा करतात. विशेष म्हणजे, हे शेतकरी शेतमाल विक्रीसाठी तेलंगणा राज्यातील शहरांमध्ये जाऊन येतात. त्यामुळे या शेतकऱ्यांसोबतच कोरोनाची साथ अहेरी परिसरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या ये-जा करण्यावर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.

प्रतिबंधीत कीटकनाशकांचा वापरपरप्रांतीय शेतकरी प्रामुख्याने कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या ग्लायसील चोरबिटी या कापसाच्या बियाण्यांची लागवड करतात. मोठ्या प्रमाणात तण नाशकाचा वापर केला जाते. शेतकºयांच्या जमिनी अल्पावधीतच नापीक बनत चालल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या ट्रॅक्टरचाही रोजगार हिरावल्या गेला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस