शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

पावसाअभावी धानाचे झाले तणीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:46 IST

मागील दीड महिन्यांपासून पावसाने कायमची उसंत घेतली असल्याने ज्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणचे धानपीक करपले आहे. धानपिकाची तणीस झाली आहे. यावर्षी सुरुवातीपासून समाधानकारक व नियमित पाऊस पडला.

ठळक मुद्देदीड महिन्यापासून पाऊस बेपत्ता : हजारो हेक्टरवरील धानपीक करपले; शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील दीड महिन्यांपासून पावसाने कायमची उसंत घेतली असल्याने ज्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणचे धानपीक करपले आहे. धानपिकाची तणीस झाली आहे.यावर्षी सुरुवातीपासून समाधानकारक व नियमित पाऊस पडला. त्यामुळे धानाचे पऱ्हे टाकण्यापासूनचे रोवणीपर्यंतची कामे अगदी वेळेवर झाली. आॅगस्ट महिन्यापर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे हिरवेगार धानपीक डोलत होते. मात्र सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने कायमची उसंत घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी तलाव, बोड्यांचे पाणी देत आहेत. त्यामुळे त्यांचे धानपीक चांगले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकºयांचे धानपीक करपले आहे.धानामध्ये हलका, मध्यम व जास्त कालावधीचा धान लावला जातो. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही, असे शेतकरी हलका व मध्यम कालावधीत निसवणारे धान लावतात. सदर धान लवकर निसवत असल्याने या धानाची रोवणी वेळेवर होणे आवश्यक आहे. मात्र मागील काही वर्षांपासून पावसात सातत्य राहत नसल्याने धानाची रोवणी लांबत होती. याचा परिणाम हलक्या धानाच्या उत्पादनावर होत होता. त्याचबरोबर ऐन कापणीच्या कालावधीत पाऊस पडत असल्याने हलक्या धानाची नासाडी होत होती. मागील काही वर्षांचा हा कटू अनुभव लक्षात घेऊन यावर्षी काही शेतकऱ्यांनी जड धानाची लागवड केली. मात्र पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंदाज चुकला व याचा फटका यावर्षी शेतकऱ्यांना बसत आहे. हजारो हेक्टरवरील धानपीक करपायला लागले आहे.शेतकऱ्यांनी धानपिकाच्या लागवडीवर लाखो रूपयांचा खर्च केला. मात्र ऐन धान निसवण्याच्या मार्गावर असताना पाण्याअभावी धान करपले आहे. जिल्हाभरात दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही शासनाने मात्र गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्ह्याच्या यादीमधून वगळल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत पुन्हा सर्वे केल्यास जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची पैसेवारी ५० पेक्षा कमी येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.तुडतुडा रोगाचाही प्रादुर्भाव वाढलामागीलवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा धानपीक निसवण्याच्या मार्गावर असताना तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. देसाईगंज, कुरखेडा या तालुक्यांमधील काही शेतांवर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. विविध प्रकारचे महागडे कीटकनाशके फवारून सुद्धा रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. मागील वर्षी कित्येक एकरवरील धानपीक तुडतुडा रोगामुळे करपले होते. हीच स्थिती यावर्षीही राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कपाशी, सोयाबीनलाही फटकाकोरडवाहू क्षेत्रात सोयाबीन व कापूस पिकाची लागवड केली जाते. जिल्ह्यात दिवसेंदिवस कापूस पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. मागीलवर्षी कापसाचे पीक दमदार होते. यावर्षी मात्र पावसाअभावी कापूस पीकही करपायला लागले आहे. बोंड लागण्याच्या मार्गावर असतानाच कापसाची पिके पिवळी पडली आहेत. याचा मोठा फटका कापूस उत्पादकांनाही होणार आहे. त्यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरीसुद्धा चिंतेत पडला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी