शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
4
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
5
धक्कादायक..! नात्यातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
6
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
7
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
8
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
9
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
10
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
11
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
12
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
13
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
14
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
15
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
16
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
17
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
18
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
19
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
20
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!

काँग्रेसचा सायकल मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला

By admin | Updated: November 18, 2015 01:25 IST

रविवारच्या मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या भावात ३६ पैसे प्रती लिटर तर डिझेलच्या भावात ८७ पैसे प्रती लिटर दर वाढ शासनाने केली आहे.

निवेदन सादर : पेट्रोल, डिझेल दरवाढीचा केला निषेधगडचिरोली : रविवारच्या मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या भावात ३६ पैसे प्रती लिटर तर डिझेलच्या भावात ८७ पैसे प्रती लिटर दर वाढ शासनाने केली आहे. पेट्रोल, डिझेलच्या या दरवाढीच्या निषेधार्थ गडचिरोली-चिमूर लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला. दरम्यान युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध केला.युवक काँग्रेसचे सचिव पंकज गुड्डेवार, अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे यांच्या नेतृत्वात सकाळी ११.३० वाजता येथील इंदिरा गांधी चौकातून कॉम्प्लेक्स मार्गे सायकल मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. सायकल रॅलीदरम्यान युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप-सेना युती सरकार विरोधात नारेबाजी केली. संतप्त पदाधिकाऱ्यांनी भाजप सत्ताधाऱ्यांचा यावेळी खरपूस समाचार घेतला. या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते नंदू वाईलकर, पांडुरंग घोटेकर, अमोल भडांगे, दीपक ठाकरे, तौखिक शेख, प्रभाकर वासेकर, हार्दिक सुचक, मिलिंद खोब्रागडे, राकेश गणवीर, प्रफुल आचले, नचिकेत जंबेवार, प्रदीप मुंजमकर, अजय कुमरे, केवळराव नंदेश्वर, प्रफुल वाकुडकर, जितेंद्र सोमनकर, रवींद्र भरडकर, शुभम पेमपलवार, महेश कोटरंगे, सचिन बदन, कैलाश ठाकरे, राहूल ठाकरे, गौरव अलाम, मिलिंद किरंगे, नरेंद्र भैसारे, कुलदीप इंदुरकर, अकबर शेख, इरफान पठाण, अवधेश नरोटे, रवी उसेंडी, विनोद पोरेटी, जीवन कुत्तरमारे, बाळू मडावी, मिलिंद खोब्रागडे, शेखर कोत्तावार आदीसह काँग्रेस व युवक काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)दरवाढ मागे घ्यायुवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात पेट्रोल व डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दुचाकी चालविणे कठीण होते, असे निवेदनात म्हटले आहे.