शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

सायबर गुन्हेगारीवर आळा बसेल

By admin | Updated: August 17, 2016 01:44 IST

नव्या तंत्रासोबत आलेली नवी गुन्हेगारी रोखण्यासाठी सायबर लॅब उपयोगी ठरणार आहे.

पालकमंत्र्यांचा आशावाद : पोलीस अधीक्षक कार्यालयात सायबर लॅबचे उद्घाटन गडचिरोली : नव्या तंत्रासोबत आलेली नवी गुन्हेगारी रोखण्यासाठी सायबर लॅब उपयोगी ठरणार आहे. सायबर लॅबच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पोलीस दलाला सक्षमपणे सायबर गुन्हेगारी रोखण्यास मदत होणार आहे. सायबर लॅबद्वारे सायबर गुन्हेगारीला आळा असेल, असा आशावाद आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. १५ आॅगस्ट रोजी सोमवारला येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीत अद्यावत सायबर लॅबचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते. सायबर लॅब उभारण्याची सदर योजना विशेष पोलीस महानिरीक्षक (महिला अत्याचार प्रतिबंध व सायबर गुन्हे) यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येत आहे. या सायबर लॅबकरिता सी- डॅशच्या तज्ज्ञांकडून सायबर सेलचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सदर सायबर लॅबकरिता आवश्यक असणारे आवश्यक असणारे आधुनिक यंत्र सामुग्री व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. हँकिंगच्या माध्यमातून पैशाचे गैरव्यवहार, आर्थिक फसवणुकीचे प्रकार संगणकाच्या माध्यमातून होत असून समाजातील सर्व घटकांत, फेसबूक, ट्विटर आदी सामाजिक मीडियाच्या वापरातून आक्षेपार्ह छायाचित्रे, प्रक्षोभक संदेश पाठविणे आदी प्रकारचे गुन्हे वाढत आहेत. असे गुन्हे लवकर उघडकीस यावे, यासाठी सदर लॅबचा उपयोग होणार आहे. न्यायालयात सादर करताना डिजिटल इव्हिडंसचा उपयोग होणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी) शौर्य पदक जाहीर झालेल्या पोलीस जवानांचा गौरव गडचिरोली पोलीस दलात नक्षल्यांच्या विरोधात लढणाऱ्या १० शूर जीगरबाज अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या गृह विभागाने रविवारी पोलीस शौर्यपदक मंजूर केले. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत सहायक फौजदार अनिल मधुकरराव दांगट यांना पोलीस दलातील गुणत्तापूर्ण सेवेकरिता पीएमएसएस पदक जाहीर करण्यात आले. शौर्यपदक जाहीर झालेल्या पोलीस जवान व अधिकाऱ्यांचा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अतुल श्रावण तवाडे, पोलीस शिपाई इंदरशहा वासुदेव सडमेक, प्रविण हंसराज भसारकर, बाबुराव महारू पदा, विनोद मेस्सो हिचामी, पोलीस हवालदार बस्तर लक्ष्मण मडावी, पोलीस नाईक शिपाई दिलीप ऋषी पोरेटी, दिनकरशहा बालसिंग कोरेटी, देवनाथ खुशाल काटेंगे, संजय लेंगाजी उसेंडी यांचा समावेश आहे.