शालेय विद्यार्थी सहभागी : न. पं. पदाधिकाऱ्यांचाही पुढाकार एटापल्ली : सीआरपीएफ १९१ बटालीयनच्या जवानांनी शहरातील संपूर्ण परिसर स्वच्छ करून नागरिकांना परिसर स्वच्छ राखण्याचे आवाहन केले. स्वच्छता मोहिमेत नगराध्यक्ष सरिता राजकोंडवार, भगवंतराव महाविद्यालयाचे प्राचार्य बुटे यांच्या नेतृत्त्वात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या विद्यार्थिनी तसेच जवान सहभागी झाले होते. शहरातील गोटूल परिसरातून स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता उपक्रमानंतर विद्यार्थ्यांना मिठाई वितरित करण्यात आली. यावेळी बटालीयनचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, उपकमांडंट संजय शर्मा, सहायक कमांडंट आशुतोष निकुंभ, डॉ. रितेश परचाके, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव, पं. स. उपसभापती संजय चरडुके, पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पीएसआय माधव इंगळे, मैंद, पुंगाटी, दुर्गे, डांगे, मुख्याध्यापक कुळमेथे, मेश्राम, कोडापे उपस्थित होते. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यशस्वीतेसाठी शहरातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
सीआरपीएफ जवानांनी केली स्वच्छता
By admin | Updated: January 7, 2017 01:37 IST