सुरक्षा सेवा पदकाने जवानांचा गौरव : व्हॉॅलिबॉल स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक गडचिरोली : येथील पोलीस मुख्यालय संकुलात असलेल्या सीआरपीएफ १९२ बटालियनच्या वतीने सीआरपीएफचा ७७ व्या स्थापना दिन बुधवारी साजरा करण्यात आला. यावेळी व्हॉलिबॉल स्पर्धेतील विजेत्यांना तसेच जवानांना महानिदेशक प्रशस्ती पत्र व आंतरिक सुरक्षा सेवा पदक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफचे अप्पर महानिरीक्षक दीपक मिश्रा होते. यावेळी सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक राजकुमार, उपमहानिरीक्षक दिनेश उनियाल, १९२ बटालियनचे कमांडंट मनोजकुमार उपस्थित होते. स्थापना दिनाचे औचित्य साधून विविध पदावर कार्यरत जवानांचा महानिदेशक प्रशस्ती पत्र व आंतरिक सुरक्षा सेवा पदक देऊन सन्मान करण्यात आला. व्हॉलिबॉल स्पर्धेत १९२ बटालियन व ११३ बटालियनमध्ये सामना खेळविण्यात आला. या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या संघाला अप्पर महानिदेशकांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौैरविण्यात आले. यावेळी जवानांसाठी स्नेह भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सीआरपीएफच्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमात मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी बटालियनमधील जवान उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
सीआरपीएफचा स्थापनादिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2016 01:53 IST