सर्व नेते हजर : नगराध्यक्ष पदासाठी चार जणांनी दिल्या मुलाखतीदेसाईगंज/गडचिरोली : १८ डिसेंबर रोजी होवू घातलेल्या देसाईगंज नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून बुधवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी काँग्रेसकडे नगराध्यक्ष पदासाठी चार तर नगरसेवक पदासाठी ५४ जणांनी मुलाखती दिल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष व विधी मंडळातील काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार, गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक सुरेश भोयर, विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक डॉ. भगत, माजी खा. मारोतराव कोवासे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, प्रदेश काँग्रेसचे सचिव रवींद्र दरेकर, माजी प्रदेश सचिव हसनअली गिलानी आदी उपस्थित होते.यावेळी ५४ जणांनी नगरसेवक पदासाठी मुलाखती दिल्या. देसाईगंज येथे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्या पत्नी विद्या मोटवानी, अर्चना भास्कर डांगे, विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक निलोफर अंजूम अब्दुल रकीब शेख, कल्पना किसना भांडारकर, नीता संजय गुरू यांनी नगराध्यक्ष पदासाठी मुलाखती दिल्या. त्यानंतर गडचिरोली येथे सायंकाळी ६ वाजता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांच्या निवासस्थानी मुलाखतींना सुरुवात झाली. यावेळी निरीक्षक सुरेश भोयर, डॉ. नामदेव उसेंडी, माजी खा. मारोतराव कोवासे, माजी आ. आनंदराव गेडाम, हसनअली गिलानी आदी उपस्थित होते. गडचिरोली येथे नगराध्यक्षपदासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी ४० जणांनी मुलाखती दिल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसनअली गिलानी यांनी लोकमतशी बोलताना दिली. (स्थानिक प्रतिनिधी)
देसाईगंज येथे काँग्रेसकडे उमेदवारी मागणाऱ्यांची गर्दी
By admin | Updated: October 27, 2016 01:39 IST