शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
5
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
6
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
7
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
8
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
9
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
10
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
11
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
12
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
13
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
14
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
15
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!
16
हृदयद्रावक! एका पायलटच्या लग्नासाठी कुटुंबीय शोधत होते मुलगी तर दुसऱ्याला १ महिन्याचा मुलगा
17
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
18
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
19
Life Lesson: तुम्हाला अतिविचार करण्याची सवय आहे? मग 'हा' गुरुमंत्र येईल कामी!
20
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?

तलावातील २१ अतिक्रमणधारकांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: January 18, 2015 22:43 IST

येथील सिंचन विभागाच्या मालकीच्या तलावातील मोकळ्या जागेत अतिक्रमण करून पक्के बांधकाम करणाऱ्या २१ जणांवर गडचिरोली पोलिसांनी भादंविचे कलम ४४७ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

गडचिरोली : येथील सिंचन विभागाच्या मालकीच्या तलावातील मोकळ्या जागेत अतिक्रमण करून पक्के बांधकाम करणाऱ्या २१ जणांवर गडचिरोली पोलिसांनी भादंविचे कलम ४४७ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.राजू देशमुख, सिद्धार्थ मेश्राम, विलास कुंभारे, संदीप बिस्वास, सुनंदा मडावी, वासुदेव बडवाईक, स्नेहल गेडाम, रघुनाथ भोयर, जया कोडे, माधुरी खोब्रागडे, वनिता बांबोळे, नरेश सिंहगडे, संजय लेनगुरे, राजू यादव, ललीता मुनघाटे, देवराव कोवाची, दिलीप चांदेकर, हिरामण जगन्नाथ, सुनिता कुंभारे, सुंदराबाई करकाडे व श्याम मोहुर्ले अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील बट्टूवार पेटोल पंपाच्या मागे मोठा तलाव असून, या तलावाचा विस्तार गोकुळनगर व चनकाईनगरपर्यंत झाला आहे. सुमारे ५० हेक्टरहून अधिक जागेचा हा तलाव आहे. परंतु गेल्या पाच-सहा वर्षांपासून या तलावात वेगाने अतिक्रमण केले जात आहे. आतापर्यंत चार ते पाच हेक्टर जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी या तलावात पक्की घरे बांधली आहेत. काही जणांनी तर तलावाची जागा आपल्याच मालकीची समजून दुसऱ्यांना मोठ्या रकमेत विकण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. गुन्हे दाखल झालेल्या मंडळींमध्ये काही शिक्षक, महसूल व अन्य विभागातील कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. सिंचन विभागाने नव्या अतिक्रमणधारकांना दोन-तीनदा नोटीसही बजावल्या. परंतु त्यांनी नोटिसीला न जुमानल्याने सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन बांडे यांनी अखेर गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी २१ अतिक्रमणधारकांविरूद्ध कलम ४४७ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली असून, शासकीय जमीन विकून पैसे लाटणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अश्विनी शेंडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)