लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एका महिलेच्या पतीचे वकीलपत्र घेऊन कोर्टात लढून त्याला तुरूंगातून सोडवून देतो असे सांगून १५ हजार रुपये घेतल्यानंतर प्रत्यक्ष काहीच केले नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा आरोप एका महिलेने केला. तिच्या तक्रारीवरून भामरागड पोलिसांनी भामरागड क्षेत्राचे जि.प.सदस्य अॅड.लालसू नोगोटी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.ललिता उसेंडी रा.पेरमलगट्टी असे तक्रारकर्त्या महिलेचे नाव आहे. तिचे पती एका गुन्ह्यात आरोपी असल्यामुळे ते सध्या न्यायालयीन कोठडीत चंद्रपूरच्या कारागृहात आहे. अॅड.नोगोटी यांनी त्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी वकील या नात्याने १५ हजार रुपये घेतले. पण पुढे काहीच केले नाही अशी तक्रार त्या महिलेने केले. त्यामुळे पोलिसांनी कलम ४२०, ४०६ नुसार गुन्हा नोंदविला. यासंदर्भात नोगोटी यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क झाला नाही.
जि.प.सदस्य नोगोटींवर फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:24 IST
एका महिलेच्या पतीचे वकीलपत्र घेऊन कोर्टात लढून त्याला तुरूंगातून सोडवून देतो असे सांगून १५ हजार रुपये घेतल्यानंतर प्रत्यक्ष काहीच केले नसल्यामुळे ..........
जि.प.सदस्य नोगोटींवर फसवणुकीचा गुन्हा
ठळक मुद्देवकीलपत्र घेतले नाही : महिलेची तक्रार