शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांशी धाडसाने मुकाबला: गडचिरोली पोलिसांचे 'शौर्य', १९ जणांना पदक जाहीर

By संजय तिपाले | Updated: January 25, 2024 15:05 IST

एका अधिकाऱ्यास राष्ट्रपती पदक...

गडचिरोली : दुर्गम, अतिदुर्गम भागात नक्षल्यांशी धाडसाने मुकाबला करत सेवा बजावणाऱ्या जिल्ह्यातील १८ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य तर एका अधिकाऱ्यास राष्ट्रपती पदक मिळाले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाच्या गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीत जिल्ह्यातील १९ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थान मिळवल्याने ही मोठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

पोलिस दलात उत्कृष्ट, धाडसी व गुणवत्तापूर्ण सेवा देणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदक देऊन गौरविले जाते. प्रजासत्ताकदिनापूर्वी हे पदक घोषित केले जातात. त्यानुसार २५ जानेवारीला केंद्रीय मंत्रालयाने ही यादी जाहीर केली. जिल्ह्यात सेवा बजावलेले तत्कालीन अपर अधीक्षक सोमय मुंडे, उपअधीक्षक संकेत गोसावी यांच्यासह पोलिस नाईक कमलेश नैताम, शंकर बाचलवार, मुन्शी मडावी, देवेंद्र आत्राम, संजय वचामी, विनोद  मडावी, गुरुदेव मेश्राम, माधव मडावी, जीवन नरोटे, हवालदार मोहन उसेंडी, कॉन्स्टेबल हिराजी नेवारे, ज्योतिराम वेलादी, सूरज चुधरी, विजय वडेट्टवार, कैलास गेडाम यांना शौर्य पदक जाहीर झाले असून सहायक उपनिरीक्षक देवाजी कोवासे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताकदिनी या सर्वांचा  मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात गौरव केला जाणार असून राष्ट्रपतींच्या हस्तेही लवकरच सन्मान केला जाणार आहे. 

गतवर्षी ६२ जणांची पदकाला गवसणीदरम्यान, गतवर्षी जिल्हा पोलिस दलातील ६२ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक जाहीर झाले होते. यंदाही गडचिरोली पोलिस दलाने गौरवशाली परंपरा कायम ठेवत पदकांमध्ये दबदबा राखला. पदकप्राप्त पोलिस अधिकारी व अंमलदारांचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक यतीश देशमुख, बी. रमेश व कुमार चिंता यांनी स्वागत केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसGadchiroliगडचिरोलीIndependence Dayस्वातंत्र्य दिनPresidentराष्ट्राध्यक्ष