शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य कोसळले, पत्नीच्या अंगावरून गेला ट्रक

By संजय तिपाले | Updated: May 31, 2025 17:22 IST

कोरची- कुरखेडा मार्गावरील घटना : पती गंभीर जखमी, ट्रकसह चालक पसार

गडचिरोली : कोरची-कुरखेडा महामार्गावरील ढोलीगोटा देवस्थानाजवळील एका वळणावर भरधाव मालवाहू ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यात पतीच्या डोळ्यादेखत पत्नीच्या अंगावरून ट्रक गेला. ही घटना ३१ मे रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. रेवताबाई राजाराम उसेंडी (वय ६४, रा. जामटोला, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली) असे मृत पत्नीचे नाव आहे. पती राजाराम लालसू उसेंडी (६७) यांच्या उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

उसेंडी दाम्पत्य जामटोला गावाहून शनिवारी सकाळी नऊ वाजता दुचाकीवरून ( एमएच ३३ एल -६४२५) कोरची तालुक्यातील झगडवाही गावातील आजारी नातेवाइकास भेटण्यासाठी निघाले होते. ना बेडगाव जवळील ढोलीगोटा देवस्थानपुढील कुरखेडा-कोरची राष्ट्रीय महामार्गावरच्या वळणावर कुरखेडाला निघालेल्या अज्ञात मालवाहू ट्रकचा ताबा सुटला. ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दोघेही खाली कोसळले.

पत्नी चाकाखाली सापडल्याने तिच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. पती राजाराम यास कोरची ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले. बेडगाव पोलिस मदत केंद्रातील उपनिरीक्षक शिवाजी ढाकरे, अंमलदार देवाजी धकाते, रतन कुमरे, चंद्रमानी जंजाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृत पत्नी रेवताबाई उसेंडी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मृतदेहावरून ट्रक मागे घेऊन चालक पसारअपघातानंतर चालकाने मृतदेहावरूनच ट्रक मागे घेतला व पसार झाला. घटनास्थळी आढळलेल्या ट्रकच्या चाकांच्या खुणांवरून ही बाब पोलिसांनी ओळखली. पोलिसांनी ट्रकसह चालकाचा शोध सुरू केला आहे. यापूर्वीही अपघातकाही महिन्यांपूर्वी याच मार्गावरील कोसमी फाट्याच्या वळणावर दामेश्वर गावातील एका महिलेच्या अंगावरून ट्रक गेला होता. त्या महिलेचा मृतदेहदेखील छिन्नविच्छिन्न झाला होता.

टॅग्स :AccidentअपघातGadchiroliगडचिरोली