शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी तालुक्यात कापूस वेचणीचा दर १० रुपयांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 14:43 IST

विद्यार्थीही करताहेत वेचणी : मजुरांच्या शोधात भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : सध्या शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात कापूस फुटला असून, तो वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने घरादारातील आबालवृद्धांसह बाळगोपालांनाही स्वतःच्या शेतात कापसाची वेचणी करावी लागत आहे. जवळपास शेतकऱ्यांची दिवाळी शेतात काम करण्यातच गेली आहे. दिवाळीच्या सुट्यांचा आनंद घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या कामातून सुटका मिळत नसल्याने नको ही सुटी अशी म्हणण्याची वेळ यावर्षी विद्यार्थ्यांवर सध्या आली आहे. पाऊस लांबल्यामुळे कामाची एकच धूम जिकडेतिकडे पहावयास मिळत असून, मजुराची टंचाई शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी सध्या ठरत असल्यामुळे कॉटन बेल्टची दैना झाली आहे.

चामोर्शी तालुक्यात धान व कापूस ही मुख्य पिके आहेत. ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी सुरू राहिल्यामुळे फुटलेला कापूस ओला झाला व त्याला कोंबही फुटले. अशा परिस्थितीत कापूस वेचणी थांबली. सोबतच धान कापणीचा हंगामही सुरू झाला आहे. त्यामुळे मजुरांची टंचाई भासत असतानाचा दिवाळीचा सण आल्याने मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा पहिला वेचापण होऊ शकला नाही. सध्या वेचणीचे दर १० रुपये प्रतिकिलो असून, ऑटोची मजुरी व इतर खर्च मिळून १५ रुपये प्रतिकिलो खर्च येत आहे. 

प्रत्येक गावांत धान कापणीचीही लगबग दिवाळीनंतर आता धान कापणीलाही सुरुवात झाली आहे. मजूरवर्ग धान कापणी व कापूस वेचणीच्या कामाता दुभागला आहे. त्यामुळे दोन्ही कामांसाठी पुरेसे मजूर मिळणे बंद झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांनाच शेतीची कामे करावी लागत आहे. 

दिवाळीची सुटी शेतीकामातच सध्या दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्याचे दिवस असताना सुटीच्या दिवसांत विद्यार्थ्यांनाही पाठीवर ओटी बांधून कापूस वेचणी करावी लागत आहे. त्याशिवाय आता पर्याय शिल्लक नाही.

पावसामुळे लांबला हंगाम पंधरा दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे कापूस वेचणीचा हंगाम लांबला आहे. आता धान कापणी व कापूस वेचणी दोन्ही कामे एकाचवेळी आल्याने मजुरांचे प्रचंड टंचाई ग्रामीण भागामध्ये दिसून येत आहे. मजुरांना अधिकची किंमत मोजावी लागत आहे. तरीही मजूर मिळत नाही.

"सध्या धान कापणी व कापूस पिकाची वेचणी दोन्ही कामांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे मजूर मिळणे कठीण झाले आहे. कापूस वेचणीचा दर १० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेती धोक्यात आली आहे." - प्रमोद दुधबळे, शेतकरी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रcottonकापूसfarmingशेतीGadchiroliगडचिरोली