येनापूर : मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने येनापूर परिसरातील कापूस पिकाला जोरदार फटका बसला. या परिसरातील ९० टक्के कापूस अवकाळी पावसामुळे नष्ट झाले. त्यामुळे येनापूर परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त आहे. येनापूर परिसरात ९५ टक्के नागरिक शेतकरी आहेत. अनेकांनी आपल्या शेतात धानासह कापसाची लागवड केली होती. जवळपास ७५ टक्के धानपिक तर २५ टक्के शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली होती. अनेक शेतकऱ्यांना धानाची लागवड करतांना दुबार पेरणी करावी लागली होती. मात्र धानाचे पीक हाती आले असतांना डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसात तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे धानपिकही सडले. अनेक शेतकऱ्यांचे धान मळणीचे काम सुरू असतांना अडथळा निर्माण झाला. शिवाय मध्येच मळणीचे काम थांबवावे लागले. मात्र काढणीला आलेले कापूस अवकाळी पावसामुळे नष्ट झाले आहे. परिसरातील ९० टक्के कापसाचे पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे शेती उत्पादनावर खर्च करण्यात आलेली भरपाई निघणे कठीण झाले आहे. (वार्ताहर)
पावसामुळे कापसाचे नुकसान
By admin | Updated: January 15, 2015 22:52 IST