शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Live Updates : लग्न पडलं महागात! लॉकडाऊनचे नियम तोडून विवाहसोहळा; वधुपित्याला ५० हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 19:52 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : संतोषसिंग जुनी यांनी लॉकडाऊनचे नियम तोडून हा समारंभ आयोजित केल्याने त्यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

आरमोरी (गडचिरोली) - कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी शासन-प्रशासनाने जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन करून विवाह समारंभ आयोजित करणाऱ्या आरमोरी येथील वधुपित्याला ५० हजारांचा दंड आकारण्यात आला. सदर कारवाई तहसील कार्यालय व नगर परिषदेच्या वतीने गुरुवारी संयुक्तरीत्या करण्यात आली.

आरमोरीच्या शास्त्रीनगर बीएसएनएल टॉवरजवळील संतोषसिंग रंजितसिंग जुनी यांच्या मुलीचा विवाह २० मे रोजी होता. या विवाहात २०० पेक्षा अधिक लोक उपस्थित आहेत, अशी माहिती मिळताच आरमोरी नगर परिषद व तहसील कार्यालयाच्या संयुक्त पथकाने विवाहस्थळी जाऊन पाहणी केली. त्यात विवाह समारंभात २०० पेक्षा अधिक लोक आढळून आले.

संतोषसिंग जुनी यांनी लॉकडाऊनचे नियम तोडून हा समारंभ आयोजित केल्याने त्यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई नायब तहसीलदार संजय राठोड, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे, स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता नितीन गौरखेडे, तलाठी पी.जी. गजभिये, तहसील कार्यालयाचे महसूल सहायक संदीप तुपट, प्रशांत भैसारे, नगर परिषदेचे कर्मचारी राजू कांबळे, मोहन कांबळे, सुधीर सेलोकर, मंगेश चिचघरे आदींच्या उपस्थितीत करण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGadchiroliगडचिरोलीmarriageलग्न